Aurangabad National People Court settled 51 crore case  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : राष्ट्रीय लोकअदालतीत मिटली तब्बल ५१ कोटींची प्रकरणे

न्यायाधीश, वकील संघाच्या सभासदांनीही केले प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्हा न्यायालयात शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १,१६५ प्रलंबित व ६०९ दाखलपूर्व असे एकूण १ हजार ७७४ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन प्रलंबित प्रकरणांमध्ये ४८ कोटी ५४ लाख ६२ हजार ८९६ व वादपूर्व प्रकरणांमध्ये एकूण ०२ कोटी ५५ लाख ६७ हजार १११ रुपये इतकी वसुली झाली. एकूण ५१ कोटी १० लाख ३० हजार ७ रुपयांएवढ्या रक्कमेचा समोवश असलेली प्रकरणे लोक अदालतीमध्ये तडजोडीने मिटली. या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. कलोती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

लोक अदालतमध्ये मोटार अपघात, विज चोरी, धनादेश अनादर, भूसंपादन व तडजोडयुक्त दिवाणी, फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आली होती. तसेच वादपूर्व प्रकरणात आसीआयसीआय बँक, गोदावरी अॅग्रोटेक प्रा.लि. भारत संचार निगम लि. व्होडाफोन-आयडीया, जॉन डीअर फायनान्स, महापारेषण आणि ट्रॅफिक ई-चालनाची आणि मध्यस्थी केंद्रामधील वादपूर्व प्रकरणे, बजाज फायनान्स, उज्जीवन स्मॉल फायनान्स, फुलर्टन इंडिया केडीट, एचडीएफसी बँक, श्रीराम सिटी आरबीएल बँक, टीव्हीएस केडीट (सर्व शाखा), युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक आफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, एसबीआय कार्ड रिपेमेंट प्रा.लि, कॅनरा बँक, युको बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब व सिंध बँक (सर्व शाखा) यांची वादपूर्व प्रकरणे (सर्व शाखा) मध्यस्थी केंद्रामधील वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली.

लोकअदालतीच्या यशस्‍वीतेसाठी प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. कलोती यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायाधीश एस. एस. भिष्‍मा, टी. जी. मीटकरी, एस.के. कुलकर्णी, एस.एस. देशपांडे, एम.एस. देशपांडे, ए.ए. कुलकर्णी, पी.आर. शिंदे, दिवाणी न्‍यायाधीश एस.डी. कुर्हेकर, मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी तथा प्रभारी सचिव जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण जयेश आंबोडकर यांनी बैठका घेतल्या. जिल्हा वकील संघाचे अध्‍यक्ष अॅड. संतोष प्राथीकर, सचिव अशोक मुळे इतर पदाधिकारी आणि वकील संघाच्‍या सभासदांनी सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT