Astik Kumar Pandey 
छत्रपती संभाजीनगर

गर्दी पाहून आस्तिककुमार पांडेय जेव्हा भडकतात...

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन करा, असे घसा कोरडा होईपर्यंत प्रशासनातर्फे आवाहन केले जात आहे. पण अद्याप नागरिक सुधारण्यास तयार नसल्याचे चित्र सध्या शहरात आहे. शुक्रवारी रात्री महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय फेरफटका मारण्यासाठी बंगल्यातून बाहेर पडले. हिमायतबाग परिसरात ते गेले असता याठिकाणी टपऱ्यांवर मोठी गर्दी होती. कोणाच्याही तोंडावर मास्क नव्हता. सुरक्षित अंतराच्या नियमाची कोणाला आठवण नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या श्री. पांडेय यांनी येथे रस्त्यावर थाटण्यात आलेल्या टपऱ्या हटविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. शनिवारी (ता. २७) तीन टपऱ्या, पाच शेडवर अतिक्रमण हटाव विभागाने कारवाई केली.


शहरातील वाढता कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन गेल्या काही दिवसांपासून केले जात आहे. लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळावेच लागतील, असे आवाहन प्रशासक आस्तिकुकमार पांडेय हे रोज करत आहेत. प्रशासनाने आता रात्रीची संचारबंदी सुरू केली आहे. तरिही नागरिक रात्रीच्या वेळी विनाकरण रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. शुक्रवारी रात्री श्री. पांडेय हे हिमायत बाग चौकापर्यंत पायी फिरायला गेले असता, या चौकातील चित्र पाहून ते अवाक् झाले. येथे छोट्या-मोठ्या टपऱ्या, शेडच्या दुकानांत मोठी गर्दी झालेली होती. त्यामुळे प्रशासकांनी अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार शनिवारी सकाळीच महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक हिमायतबाग चौकात पोचले व रस्त्यावरील तीन लोखंडी टपऱ्या, पाच शेड जमीनदोस्त केले. यावेळी नागरिक मित्र पथकाने मास्क न घातलेल्या नागरिकांवर कारवाई केली. अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, मजहर अली, पी. बी. गवळी यांनी ही कारवाई केली.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT