depreesed women tried to suicide 
छत्रपती संभाजीनगर

हळद पुसलीही नव्हती, तोच जीव द्यायला गेली!

सुषेन जाधव

औरंगाबाद: लग्नाच्या दोन महिन्यांत नव्या संसाराची स्वप्न घेऊन शहरात आलेल्या सुचिताला मात्र सासरी पोषक वातावरण न मिळाल्याने नैराश्‍य आले. वरचेवर नैराश्‍यात बुडालेल्या सुचिताने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेत भल्या पहाटेच घर सोडलं, काळ आला होता; पण वेळ आली नव्हती या उक्तीनुसार दामिनी पथकाने धाव घेतली अन् सुचिताचा जीव वाचविला. तिला त्रास देणाऱ्या नणंद, सासूचे समुपदेशन करत तिला पुन्हा नांदायला पाठविले.

वीटभट्टीवर कामगार असलेल्या दांपत्याची १९ वर्षीय सुचिता हर्सूल परिसरात राहते. लग्नानंतर दोन महिन्यांनी सुचिता आणि सुगंध (नाव बदललेलं आहे) दोघे राहू लागले. पतीचा काडीमात्र त्रास नाही, मात्र नणंद, सासूशी सुचिताचे पटत नसे. त्या दोघी एकत्र राहत असत, मात्र सुचिताशी त्या पटवून घेत नसत. यातून तिला नैराश्‍य येत गेले.

पहाटे पाचलाच घराबाहेर पडली-
सकाळी सकाळी ती हर्सूल तलावावर पोचली. तिची अवस्था चंद्रकला राठोड या जागरूक महिलेने हेरली आणि दामिनी पथकाच्या इन्चार्ज पोलिस उपनिरीक्षक स्नेहा करेवाड यांना संपर्क केला. करेवाड यांनी तत्काळ हर्सूल गाठले. दरम्यान, सुचिताचे दीर, सासू तिला शोधत होत्या. सुचिताला सोबत घेऊन करेवाड पथकासह तिच्या घरी गेल्या. नंतर करेवाड यांनी सासूचा ‘क्लास’ घेत चार गोष्टी समजावूनही सांगितल्या. सुचिताच्या वडिलांशीही फोनवर बोलल्या. यातून सर्वांनाच हायसे वाटले. ही कारवाई दामिनी पथकाच्या करेवाड यांच्यासह अंमलदार लता जाधव, आशा गायकवाड, साक्षी संगमवाड यांच्या चमूने केली.

तिला नवऱ्याचा काही त्रास नव्हता, पण नणंद, सासूशी पटत नव्हतं त्यांच्यातला अबोला वाढतच गेला अन सुचिताने स्वतःला संपविण्याचा निर्णय घेतला होता. नणंद, सासूसह तिचेही समुपदेशन केले आहे. ती आनंदात नांदायला गेली आहे.
-स्नेहा करेवाड, पोलिस उपनिरीक्षक, इन्चार्ज दामिनी पथक

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT