Crime news 
छत्रपती संभाजीनगर

पिशोर पोलिस ठाण्यात आरोपीने केली आत्महत्या, एक पोलिस कर्मचारी निलंबित

संतोष शिंदे

पिशोर (जि.औरंगाबाद) : पिशोर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी अटक असलेल्या आरोपीने शौचालयात सफाईसाठी असलेले रसायन सेवन केल्याने झालेल्या मृत्यू प्रकरणी रविवारी (ता.२४) एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भगवान हरिदास महालकर (वय ३५, रा. खांडी पिंपळगाव, ता. खुलताबाद) हा चार दिवसांच्या पोलिस कोठडीत होता.

शुक्रवारी (ता.२२) सकाळी साडेसात वाजेदरम्यान शौचास जाण्यासाठी म्हणून त्याला पोलिस ठाण्याच्या आवारातील शौचालयात नेण्यात आले होते. शौचालयात त्याने रसायन सेवन केले होते. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती खालावल्याने महालकर याला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान भगवान महालकर याचा शनिवारी (ता.२३) मृत्यू झाला.

या प्रकरणी रविवारी सीआयडीच्या पोलिस अधीक्षक कड यांनी पिशोर पोलिस ठाण्यात येऊन या प्रकरणी तपास केला. कर्तव्यावर असलेले गार्ड एस.के.पठाण यांच्यावर ठपका ठेवून या प्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! कृषी पंपांचे ४८ हजार कोटींचे जुने वीजबिल माफ; महायुती सरकारचा निर्णय

Hockey : सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज! महाराष्ट्राची ऋतुजा पिसाळचीही निवड; २० खेळाडूंची नावं जाहीर

Latest Marathi News Live Update : एनडीए (NDA) संसदीय पक्षाच्या बैठकीला 'मंगल मिलन' असे नाव देण्यात आले

Maharashtra Gram Panchayat Elections : राज्यातील 15,155 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार! 'या' दिवशी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी; कधी होणार मतदान?

ROHIT SHARMA RECORDS: रोहित शर्माचे 'हे' ५ जागतिक विक्रम मोडणं अशक्य! नंबर १ रेकॉर्ड तर कदाचित कधीच तुटणार नाही

SCROLL FOR NEXT