Aurangabad news
Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद ऑलिम्पिक संघटना छेडणार आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काचे क्रीडा विद्यापीठ औरंगाबादमधून पुण्याला हलवल्यामुळे औरंगाबादच्या क्रीडाविश्वात नाराजीचा सूर पसरला आहे. हे क्रीडा विद्यापीठ पुन्हा औरंगाबादला आण्यासाठी सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक व संघटकांना एकत्र घेऊन औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे.

राज्य सरकारचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये औरंगाबादच्या करोडी परिसरात उभारण्यात येत असलेले क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्यात आल्याचे समजताच मराठवाड्याच्या क्रीडा विश्वात असंतोषाचे वातावरण पसरले. गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला व्हावे, या करिता क्रीडा संघटक आणि खेळाडू प्रयत्नशील होते. 

सुरुवातील शासनाने औरंगाबादला होणार असलेले स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे रिजनल सेन्टर नागपूरला हलवले. नंतर आय.आय.एम.सुद्धा पुण्याला हलवले. त्यावेळी मोठे आंदोलन औरंगाबादच्या नागरिकांनी उभारले. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगबादला क्रीडा विद्यापीठ करण्याचे जाहीर केले व त्यासाठी औरंगाबादच्या करोडी गावातील महसूल विभागाची १२२ एकर जागाही क्रीडा विद्यापीठासाठी क्रीडा विभागाला हस्तांतरित करण्यात आली. त्या जागेवर बांधकामासाठी मागच्या अर्थसंकल्पात तत्कालीन क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आर्थिक तरतूद देखील केली.

मराठवाड्याच्या क्रीडाक्षेत्रात असंतोष

पण नुकतेच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात औरंगाबादला उभारण्यात येथ असलेले क्रीडा विद्यापीठ पुण्याला करणार असल्याचे जाहीर होताच औरंगाबादसह मराठवाड्याच्या क्रीडा क्षेत्रात असंतोषाचे वातावरण पसरले.

मराठवाड्यावर झालेल्या या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी औरंगाबाद ऑलिम्पिक संघटना आंदोलन छेडणार असून आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नुकतीच क्रीडा संघटकांची एक बैठक विभागीय क्रीडा संकुलात घेण्यात आली. या बैठकीला आमदार अतुल सावे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिरीष बोराळकर, औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे डॉ.फुलचंद सलामपुरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. उदय डोंगरे यांनी संबोधित केले. यावेळी विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT