Aurangabad One and half lakh citizens benefit from water bill cut  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : पाणीपट्टी कपातीचा सव्वा लाख नागरिकांना लाभ

महापालिकेचा प्रस्ताव येणार दोन दिवसांत ः प्रशासकांची सही झाल्यानंतर आदेशाची अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत पाणीपट्टीत ५० टक्के कपात करण्याचा निर्णय शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार प्रशासनातर्फे सोमवारी किंवा मंगळवारी प्रस्ताव प्रशासकांसमोर सादर केला जाणार आहे. प्रशासकांची सही झाल्यानंतर या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. शहरात एक लाख २९ हजार निवासी ग्राहक असून, त्यांना पाणीपट्टी कपातीचा फायदा होणार आहे.

शहरातील अनेक भागाला आठ-नऊ दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचा महापालिकेच्या विरोधात रोष वाढला आहे. वर्षभराची पाणीपट्टी तब्बल चार हजार ५० रुपये महापालिका आकारते. पण पाणी केवळ महिन्यातून चार वेळा म्हणजे ४८ दिवसच देते. त्यामुळे पाणीपट्टी कमी करण्याची मागणी होत होती. त्यानुसार शिवसेनेचे पूर्व विधानसभा मतदारसंघ संघटक राजू वैद्य, आमदार अंबादास दानवे यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी केली होती. काल स्मार्ट सिटी अभियानाच्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी पाणीपट्टी ५० टक्के कमी करून दोन हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आता प्रशासकीय ठराव घेतला जाणार आहे. शनिवारी उपायुक्त अपर्णा थेटे, उपायुक्त संतोष टेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू होते. सोमवारी किंवा मंगळवारी हा ठराव प्रशासकांच्या मंजुरीसाठी जाईल, त्यानंतर अंमलबजावणी होईल, असे श्रीमती थेटे यांनी सांगितले.

निवासी नळधारकांनाच लाभ!

शहरात महापालिकेच्या रेकॉर्डनुसार सुमारे एक लाख ३५ हजार ५१५ नळधारक आहेत. यातील एक लाख २९ हजार निवासी तर उर्वरित नळधारक व्यावसायिक आहेत. पाणीपट्टी कपातीचा निर्णय फक्त निवासी कनेक्शनला देण्याचा विचार प्रशासन स्तरावर सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Neelam Gorhe : शिवसेना २५ जागांवर ठाम; वरिष्ठ स्तरावरून निर्णय होणार

Cold And Flu Myth: ओल्या केसांनी थंडीत बाहेर गेल्यास सर्दी होते का? वाचा डॉक्टरांचे मत

Pune Municipal Election : ‘मविआ’चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; तिन्ही पक्षांना प्रत्येकी ५० जागा

Asif Ali Zardari: ‘आम्हाला बंकरमध्ये लपावं लागलं...’ ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या अध्यक्षांची कबुली; काय म्हणाले?

Pune Municipal Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेला हव्यात प्रत्येकी ३५ जागा

SCROLL FOR NEXT