औरंगाबाद : टाउन हॉल येथील उड्डाणपुलाखाली साचलेला मातीचा ढीग.  
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : या उड्डाणपुलाच्या खालून कसे जाल... वाचा

मधुकर कांबळे

औरंगाबाद - महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर टाऊन हॉल येथील उड्डाणपूल आहे. मात्र या उड्डाणपुलाखाली बाराही महिने वाहणाऱ्या गटारीच्या पाण्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

आधी दुर्गंधीयुक्‍त पाण्यामुळे तर आता रस्ता खोदून ठेवल्याने ही वाट बिकट बनली आहे. या पुलाखालून अनेकांना जावे लागते मात्र पुलाच्या खालून जाणे म्हणजे मोठ्या दिव्यातून जाण्यासारखे झाले आहे.

रेल्वेस्टेशनपासून थेट जळगाव रोडला जोडणारा रस्ता व्हीआयपी रस्ता म्हणून ओळखला जातो. कारण या रस्त्यावरच सुभेदारी विश्रामृह, विभागीय आयुक्‍तालय, जिल्हाधिकारी कार्यालय आहे.

काजीवाड्यापासून आमखास मैदानाकडील क्षयरोग हॉस्पिटलपर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याने उड्डाणपूल बांधला आहे. या उड्डाणपुलामुळे टाऊन हॉल, जयभीमनगर चौकातील अपघातांची मालिका बंद झाली आहे. उड्डाणपुलावर व पुलाखाली दोन्ही बाजूने प्रकाश पडेल अशा पथदिव्यांची व्यवस्था केली आहे. मात्र उड्डाणपुलाच्या खालच्या दोन्ही बाजूंनी तयार करण्यात आलेले रस्ते अतिशय अरुंद असल्याने पुलाच्या बाजूने मोठ्या वाहनांना जाताना खूप अडचणी येत आहेत. 

टाऊन हॉल उड्डाणपुलाखाली पान-चहाच्या टपऱ्या थाटण्यात आल्या आहेत. हातगाडीवर फळे विकणारे आणि रस्त्यातच उभी राहणारी मोठी वाहने रस्त्यावरच्या रहदारीला अडथळा ठरत आहेत. उड्डाणपुलाखालून वाहणारा मोठा नाला रस्ता तयार करताना वरून बंद करण्यात आला असला तरी त्याखालून ड्रेनेजलाइन जाते.

आरेफ कॉलनीपासून सर्व बाजूंनी उतार असल्याने या ड्रेनेजमधून वाहत येणारे घाण पाणी नेमके या पुलाखाली असलेल्या चेंबरमधून संपूर्ण रस्त्यावर पसरत असते. त्यामुळे या दुर्गंधीयुक्‍त पाण्यातूनच वाहनधारक, पादचाऱ्यांना मार्ग काढावा लागतो. 

पावसाळ्यात साचते तळे 

पावसाळ्यात तर या ठिकाणी अक्षरश: तळे साचते. महापालिका प्रशासन या ड्रेनेजच्या पाण्यावर कायमचा तोडगा काढण्याऐवजी दरवेळी थातूरमातूर उपाययोजना करते. यामुळे उड्डाणपुलाखालचा भाग चकाचक होणे तर दूरच किमान तिथून ये-जा करण्याइतपत तरी कधी होईल याची या रस्त्याने जाणाऱ्यांना प्रतीक्षा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs PAK Test: वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळण्यास दिला नकार! प्रशिक्षक डॅरेन सॅमीने सर्व काही खरं सांगितलं

MPSC Talathi Exam 2026: MPSC कडून तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर! जाणून घ्या पेपर पॅटर्न, विषय आणि गुणपद्धती

रामाच्या भूमिकेसाठी रणबीरने केला योग, ध्यान आणि धर्मग्रंथाचा अभ्यास; रामायणासाठी जाणून घेतलं प्रभू श्रीरामांचं तत्वज्ञान

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये पुन्हा आंदोलनाला सुरुवात, मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित

अलोक नाथ यांच्यावर अभिनेत्रीने केलेले अत्याचाराचे आरोप; स्वत:चा अनुभव सांगत नारायणी शास्त्री म्हणाली, 'त्यांनी कधी आमच्यासोबत...'

SCROLL FOR NEXT