Aurangabad People live here Be aware of this sakal
छत्रपती संभाजीनगर

इथे माणसे राहतात, याचे भान ठेवा

कचरा पाहून प्रशासक संतप्त; रेड्डी कंपनीला दहा हजारांचा दंड

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात जागोजाग कचरा पडून असल्याने प्रशासक आस्तिककुमार पांडेय बुधवारी (ता. २२) संतप्त झाले. इथे माणसे राहतात, याचे भान ठेवा, अशा शब्दात अधिकाऱ्यांना तंबी देत कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या रेड्डी कंपनीला १० हजार रुपये दंड लावण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासकांनी दिले.

प्रशासक श्री. पांडेय यांनी सिडको, रेल्वेस्टेशन, शहानुर मियॉं दर्गा रोड, कालिकामाता मंदिर, बाळकृष्ण नगर, कारगिल उद्यान, विजयनगर भागांची पाहणी केली. दर्गा परिसरात कृषी विभागाच्या कार्यालयाच्या रस्त्याच्या कडेला कचरा आढळून आला. हा कचरा तातडीने उचलण्याचे आदेश श्री. पांडेय यांनी स्वच्छता निरीक्षकास दिले. यानंतर विजयनगर भागात कालिकामाता मंदिराच्या बाजूला कचरा आढळून आला. नागरिकांनी तेथे कचरा टाकल्याचे प्रशासकांच्या निदर्शनात आले. साचलेला कचरा पाहून संतप्त श्री. पांडेय यांनी संबंधितांना जाब विचारला. ‘इथे माणसं राहतात, याची जाणीव तुम्हांला असली पाहिजे, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

रेड्डी कंपनीला दहा हजार रुपयांचा दंड व स्वच्छता निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे, वॉर्ड अधिकारी ज्ञाते, स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव उपस्थित होते. दरम्यान प्रशासकांनी रेल्वेस्टेशन समोरील पेट्रोल पंपाच्या जागेची पाहणी केली. याठिकाणी डांबरीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याची सीमा व्यवस्थित करण्याची सूचना प्रशासकांनी अधिकाऱ्यांना केली. परिसरात सुरू असलेल्या बांधकामाची प्रशासकांनी पाहणी केली असता ते नियमानुसार सुरू नसल्याने संबंधिताला दंड लावण्याचे आदेश त्यांनी दिले. इमारत निरीक्षक कुठे आहे? असा जाब त्यांनी वॉर्ड अधिकाऱ्याला विचारला. पण त्यांना उत्तर देता आले नाही. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत? अशी तंबी त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी

Diamond Found 300 kg : अन्नाला महाग असलेल्या देशात सापडला ३०० किलोचा हिरा, राष्ट्रपतींचा तातडीचा निर्णय चर्चेत

Latest Marathi News Update LIVE : नगरपरिषद निवडणूकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंधू आल्हाद कलोती बिनविरोध

Solapur News: '१५ दिवसांत केला प्रलंबित १७ हजार दाखल्यांचा निपटारा'; जन्म-मृत्यू विभागात कर्मचारी वाढवून, सुट्या रद्द करून कामात आणली गती

Pune Police : विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा शिक्षण संस्थांबरोबर विशेष उपक्रम

SCROLL FOR NEXT