nikhil gupta sakal media
छत्रपती संभाजीनगर

रात्री आठ ते दहा वेळेतच फटाके उडवण्यास परवानगी; अन्यथा कायदेशीर कारवाई

फटाक्यांच्या माळा फोडण्यास सक्त मनाई असून रुग्णालये, न्यायालये, नर्सिंग होम, धार्मिक स्थळे, शाळा महाविद्यालये आदींच्या १०० मीटर परिसरात फटाके वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : रात्री आठ ते दहा या दोन तासातंच फटाके वाजवा, फटाक्यांच्या माळा लावू नका अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी सोमवारी (ता.१) पत्रकार परिषदेत दिला. सर्वोच्च न्यायालय, हरित लवादाचे आदेश पाळा, शांततामय जीवनाचा नागरिकांचा हक्क अबाधित राहण्यासाठी सुधारित, हरित फटाक्यांचाच आग्रह धरा, फटाके घेताना सुधारित, हरित फटाकेच दुकानदाराला मागा आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा, असे आवाहनही डॉ. गुप्ता यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, महापालिका अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाणे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड आदींची उपस्थिती होती. फटाक्यांच्या माळा फोडण्यास सक्त मनाई असून रुग्णालये, न्यायालये, नर्सिंग होम, धार्मिक स्थळे, शाळा महाविद्यालये आदींच्या १०० मीटर परिसरात फटाके वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजविण्यास परवानगी असल्याचे पत्रकार परिषदेदरम्यान सांगण्यात आले. फटाक्यांचा आवाज १२५ डेसिबलपेक्षा अधिक राहणार नाही, हेही लक्षात घेण्याचे सांगतानाच नियम तोडून फटाके विक्री करणाऱ्या दुकानदारा विरोधातही पोलिस आयुक्त कार्यालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी कार्यालय संयूक्त कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.

हे फटाके घेऊच नका

फटाके घेण्याआधी बेरिअम साल्ट, लिथियम, मर्क्युरी या पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या, तसेच आरोग्यास हानिकारक असणारे फटाके न घेण्याबाबत दुकानदारास सांगा, असे म्हणत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिवाळी सणापूर्वी आणि नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून हवेच्या शुद्धतेचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT