BAMU News सकाळ
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद: जनसंपर्क अधिकारी शिंदे तडकाफडकी निलंबित

विद्यार्थिनीशी अश्लील मोबाईल चॅटींग भोवले

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एमएएमसीजेच्या प्रथम वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मोबाइलवर अश्लील चॅटींग करणारे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी युवासेना, भारतीय विद्यार्थी सेनेसह इतर संघटनांनी लावून धरली होती. याची दखल घेत प्रभारी कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी शनिवारी (ता.१८) संजय शिंदे यांना अखेर निलंबित करण्याचे आदेश जारी केले. बारा दिवसांपूर्वी शिंदे यांच्यावर बेगमपुरा पोलीसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.

विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एका ३४ वर्षीय विद्यार्थिनीस जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी मोबाइलच्या व्हॉटस अपवर अश्‍लील मॅसेज पाठवले होते. त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.

विद्यापीठ प्रशासन संजय शिंदेंना पाठीशी घालत असल्याचा आरोप संघटनांनी केला होता. त्यामुळे भारतीय विद्यार्थी सेनेचे विद्यापीठ संघटक डॉ. तुकाराम सराफ, युवासेनेचे राज्य उपसचिव राजेंद्र जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना निवेदन सादर करून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत प्रशासनाने शिंदे यांना निलंबित करण्याचे आदेश शनिवारी सायंकाळी जारी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT