बाजारसावंगी (ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद) : शिवारात वादळी वाऱ्याने उन्हाळी बाजरीचे पीक आडवे झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. 
छत्रपती संभाजीनगर

विहामांडव्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, बाजारसावंगीत कांदा, बाजरीचे नुकसान

दिवसभर पावसाचे तसेच थंड वातावरण नव्हते. दुपारी मात्र ढगाळ हवामान तयार होऊन काहीच वेळात पाऊस सुरू झाला.

अनिल गाभूड, श्रीधर पाटील

विहामांडवा/बाजरसावंगी (जि.औरंगाबाद) : विहामांडवा (ता. पैठण) (Paithan) येथे रविवारी (ता.१६) दुपारी दीड वाजता अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. यावेळी इंद्रानगर भागातील रमेश शिकारे यांच्या घरासमोरील लिंबाचे झाड या वादळी वाऱ्यात घराच्या बाहेरच्या बाजूने पाडल्याने सुदैवाने कोणतीही जीवित व आर्थिकहानी झाली नाही. या अवकाळी पावसामुळे वातावरणामध्ये खुप गारवा निर्माण झाला होता. ढगाळ हवामानासह वादळी पावसाचे आणि काही प्रमाणात गारपीटचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. रविवारी दुपारी जोरदार वार्‍यासह पावसाची सुरवात झाली. त्याच सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. दिवसभर पावसाचे तसेच थंड वातावरण नव्हते. दुपारी मात्र ढगाळ हवामान तयार होऊन काहीच वेळात पाऊस सुरू झाला. यावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान वादळी वार्‍यामुळे गावातील वीजपुरवठा (Electricity Supply Shut) बंद झाला. पावसाने गावातील सखल भागात पाणी साचले होते. या अवकाळी पावसामुळे पिकांना मात्र फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान होत आहे. या पावसाचा फळबागांनाही फटका बसला आहे. तर नुकसान भरपाई करण्याची मागणी परिसिरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (Aurangabad Rain Updates Rain Hits Onion, Millets In Khultabad)

कांदा, बाजरीचे नुकसान

बाजारसावंगी (ता.खुलताबाद) (Khultabad) परिसरात रविवार दुपारी पावणे चारच्या दरम्यान अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी बाजरीचे (Rain Hit Millets, Onion) पिक घेण्याचा प्रयत्न केल्याने बाजरी वादळी वाऱ्याने आडवी पडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आज दुपारी एकपर्यंत तापमान ३८ अंश सेंटिग्रेड होते. मात्र अधुन-मधून ढगाळ वातावरण, वादळी वारे यामुळे बदल होऊन तापमान देखील ११ अंशाने कमी होऊन २७ अंश सेंटिग्रेड एवढे खाली आले. तीव्र उष्णतेऐवजी वातावरणात देखील गारवा निर्माण झाला. अचानक झालेल्या पावसाने कांदा बियाण्याच्या पिकाचे काढणीस आलेला कांदा तसेच उन्हाळी बाजरी व इतर पिकांचे थोड्या प्रमाणात वादळी वाऱ्याने नुकसान झाले आहे. दुपारी वादळी वारा असल्याने ढगांचा कडकडाटामुळे वीजपुरवठा देखील खंडित होता. परिसरात गावरान आंब्यासह केशर आंबा उत्पादन शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात घेत असतो. तसेच आंबा उतरविण्याचा हंगाम असून वादळी वारा व पाऊस याचा त्यास तडाखा बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

India Cricket Team: अजित आगरकर, गौतम गंभीरचा 'सिक्रेट प्लान'! रोहित शर्मा, विराट कोहली लवकरच होणार माजी खेळाडू

Crime: पैसे परत कर नाहीतर...; प्रेयसीची धमकी, ५० वर्षीय प्रियकर संतापला, रागाच्या भरात २ मुलांसह महिलेसोबत धक्कादायक कृत्य

सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

IND vs PAK : भारताच्या 'पोरींना' दिला त्रास, ICC ने उतरवला माज! पाकिस्तानच्या खेळाडूवर कारवाई

SCROLL FOR NEXT