शिवना (ता. सिल्लोड, जि.औरंगाबाद): जोरदार पावसामुळे शेतांतील ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे थांबलेले काम. शिवना (ता. सिल्लोड, जि.औरंगाबाद): जोरदार पावसामुळे शेतांतील ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे थांबलेले काम
छत्रपती संभाजीनगर

Rain Updates: औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागांत पाऊस

शिवना (ता. सिल्लोड) परिसरात शनिवारी (ता. एक) संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह झालेल्या धुवाँधार पावसानंतर सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.दोन) दुपारी तीनला पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी (ता.दोन) वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसर, लोणी खुर्दमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. खुलताबादेतील टाकळी राजेराय, भगतवाडी, ममनापूर, भडजी हलक्या सरी, तर वेरुळ परिसरात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. कन्नडमधील हतनूर, नागापूरात जोरदार, तर पीरबावड्यात मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या.

शिवना परिसरात दुसऱ्या दिवशी पाऊस

शिवना (ता. सिल्लोड) परिसरात शनिवारी (ता. एक) संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह झालेल्या धुवाँधार पावसानंतर सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.दोन) दुपारी तीनला पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. शनिवारी पावसाचा जोर एवढा होता की यात असलेल्या वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. एक-दोन ठिकाणी वीजही कोसळली. नांगरणी केलेल्या शेतांमध्ये पाणी साचले. शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी लागवड केलेल्या उन्हाळी मिरचीचे पीक आडवे झाले. ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर वाऱ्याने जमा होऊन बांधावर फेकले गेले. शेतकऱ्यांनी रब्बीत घेतलेले ज्वारी, मकाचे पिक पावसात भिजले. एकूणच शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरलेला हा पाऊस कधी पिच्छा सोडतो असे झाले आहे. आजचा पाऊस सलग दीड तास सुरु होता. सध्या शेतात पेरणीपूर्व उन्हाळी मशागतीची कामे सुरु आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी फसलेली ट्रॅक्टरसारखी वाहने शेतातच ठेवावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT