crime esakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : दरोडेखोरांच्या टोळीतील एक जेरबंद

धुळे-सोलापूर मार्गावर चाकू, कोयत्याच्या धाकाने लुटल्याचे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - धुळे सोलापूर महामार्गावरील आडगाव जावळे आणि दाभरुळ (ता.पैठण) परिसरात सात ते आठ दरोडेखोरांनी काठ्या चाकू, कोयत्याच्या धाकाने दरोडा टाकून धुमाकूळ घालत विविध ठिकाणी सहाजणांना गंभीर मारहाण केली होती. तसेच त्यांच्याकडील दागिने, रोख व मोबाईल चोरुन नेले होते. ही घटना २२ जूनच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. या दरोड्यातील एकाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. शाहरुख आमऱ्या पवार (रा. टाकळी अंबड, ता. पैठण) असे त्या दरोडेखोराचे नाव असून उर्वरित सहा ते सात दरोडेखोर अद्याप फरार आहेत.

यासंदर्भात पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी बुधवारी (ता.२०) ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले की, रवींद्र भास्करराव कुलकर्णी (३८, रा.हर्सुल) हे कुटूंबातील सहाजणांसह कारने देवदर्शनासाठी तुळगापूर, गाणगापूर येथून परत येत होते. परत येताना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आडगाव जावळे (ता.पैठण) येथील पेट्रोल पंपाजवळील रस्त्यालगत असलेल्या आयआरबीच्या स्वच्छता गृहाजवळ स्ट्रीट लाईटचे उजेडात लघुशंकेसाठी थांबले असताना त्यांच्या व्हॅनजवळ अचानक रोडच्या खालून अनोळखी सात-आठ दरोडेखोरांनी फिर्यादीला कारबाहेर ओढून रस्त्याच्या खाली नेत कोयत्याने वार करत रोकड सातहजारासह मोबाईल हिसकावला.

तसेच रवींद्र यांच्या आईवरही कोयत्याने वार करुन गळ्यातील सोन्याचे एक तोळ्याचे मंगळसूत्र (किंमत अंदाजे २० हजार रुपये) हिसकावून घेतले तसेच वैशाली कुलकर्णी यांना मारहाण करून मोबाईल व सोन्याचे मंगळसूत्र घेतले. कारमधील अनंत कुलकर्णी यांनाही कोयत्याच्या मुठीने मार देऊन ३९०० रुपये काढून घेत पोबारा केला. त्यानंतर त्याच दरोडेखोरांनी आपला मोर्चा दाभरुळ (ता.पैठण) येथील गजानन नाथा जावळे (२७ वर्ष) यांच्याकडे वळवित त्यांना मारहाण केली.

ओरडल्यास कापून टाकू अशी धमकी देत चांदीचे ब्रेसलेट, सोन्याची चैन, रोख दहा हजार, मोबाईल असा एकूण २८ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेत गावातील पद्माबाई विनायक गायकवाड यांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी चोरुन नेली होती. स्‍थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोडेखोर पवार याच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून रोकडसह, मोबाईल असा ७ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. विशेष म्हणजे आणखी दरोडेखोर साथीदार फरार असून ते कितीजण आहेत, यासंदर्भात गुन्हे शाखेचे निरीक्षक रेंगे यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा

SCROLL FOR NEXT