औरंगाबाद ः सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या संगीत विभागातर्फे आयोजित कार्यशाळेत बंदीश सादर करताना विद्यार्थी.  
छत्रपती संभाजीनगर

विद्यार्थ्यांनी केल्या नवीन बंदिशी

मधुकर कांबळे

औरंगाबाद-  हमे ज्ञान का बीज देना,
तन-तम्बुरी में नाद की गुंज देना
गहरी जमीं उंचा आसमाँ,
ठहरने मध्य में क्षितिज देना

यासारख्या एकापेक्षा एक सरस बंदिश लिहिल्या त्या कुण्या मातब्बर कवीने नव्हे तर सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी. 

औचित्य होते ते विद्यार्थ्यांना बंदिश कळावी, त्यांनी त्यांची निर्मिती करावी, या हेतूने महाविद्यालयात ‘भारतीय शास्त्रीय संगीतातील बंदिश : लेखन व सादरीकरण’ या विषयावर शनिवारी (ता. २९) झालेल्या एकदिवसीय कार्यशाळेचे.

शास्त्रीय संगीताच्या अभ्यासक्रमात अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या बंदिशीचे स्वरूप, रचना आणि आकृतिबंध लक्षात यावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. 

यात ३० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यात २० जणांनी शास्त्रीय संगीतातील नवीन बंदिशीची निर्मिती करून त्यांचे सादरीकरण केले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी संतुलित बंदिशी केल्या. कार्यशाळेत निर्माण झालेल्या बंदिशींच्या रचना आणि केवळ संख्यात्मक नव्हे तर या बंदिशींची गुणात्मक उंची लक्षात घेता प्रस्तुत कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू सफल झाला अशी भावना सर्वांनीच व्यक्त केली.

 यावेळी संगीत विभागप्रमुख डॉ. संजय मोहड यांनी बंदिश म्हणजे काय व तिच्या रचनेची तत्त्वे विशद करताना सखोल मार्गदर्शन केले. संगीत विभागाचे संवादिनी वादक गजानन केचे यांनीही मनोगत व्यक्त केले. देविका पारखे यांनी सूत्रसंचालन केले. कैलास वंजारे यांनी आभार मानले. प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद पैठणकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यशाळेसाठी तबलावादक मंगेश कुलकर्णी आणि प्रा. मेधा लखपती यांनी पुढाकार घेतला.

बंदिश म्हणजे काय?

एखादा गद्य उतारा कविता, गीत या अंगाने बंदिशीचे रूप कसे धारण करतो याबद्दल डॉ. संजय मोहड यांनी माहिती दिली. बंदिश म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून ते ‘संगीत प्रवणक्षेत्र’ आहे. त्यामुळे बंदिशीतील शब्दांमध्ये मोठ्या प्रमाणावर संगीत धारण करण्याची क्षमता असली पाहिजे असेही डॉ. मोहड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: ‘कर्मकांडां’ची लांबलचक यादी! नाशिकचा भोंदू बाबा इंटरनेटवर ट्रेंडिंग; अशोक खरात केसने गाठली गुगल टॉप सर्च कॅटेगरी

Iran-Israel War: पाकिस्तानी जहाजाला इराणने दिलं हाकलून! भारताला मात्र मुभा, होर्मुजच्या सामुद्रधुनीत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : अंबरनाथ येथील वांद्रापाडा परिसरात भटक्या कुत्र्याचा विद्यार्थिनीवर हल्ला

Pachod News : पंचवीस वर्षापासून थेरगाव येथे हरिनाम सप्ताहसह गुढीपाडव्या निमित्त घरावर सात दिवस डोलतात गुढ्या

मिस कलरफुल पूजा सावंतचं स्कीन केअर रुटीन काय? अभिनेत्री म्हणाली, 'माझ्याही चेहऱ्यावर आधी मुरूम होते...

SCROLL FOR NEXT