Aurangabad Sharnapur Zilla Parishad school teacher  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : पालकांनी भरविली जिल्हा परिषदेत शाळा!

शरणापुरातील शाळेत शिक्षक दांड्या मारत असल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शासनाच्यावतीने शिक्षकांना वेळेवर आणि भरघोस पगार देण्यात येतो. असे असूनही जिल्ह्यातील अनेक शाळेत शिक्षक जाताना दिसत नाहीत, याचीच प्रचिती सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयात बघायला मिळाली.

शरणापूर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत शिक्षक शिकवणीसाठी येत नसल्यामुळे पालकांनी सोमवारी विद्यार्थांना मेटाडोरमध्ये बसून थेट झेडपीच्या कार्यालयात आणून उभे केले. शरणापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावी ते आठवीच्या वर्गात जवळपास २५० विद्यार्थी आहेत. शाळेत नऊ शिक्षकांची पदे मजूर असून त्यातील सात शिक्षक यांची भरती करण्यात आली आहे.

या सात शिक्षकांमधून दर दिवशी दोन ते तीन शिक्षक हे सुट्टीवर असतात. यामुळे शाळेत येणारे शिक्षक हे एक किंवा दोनच असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला. दरम्यान शरणापुर येथील शालेय समितीचे अध्यक्ष व पालकांनी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेत आणत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना बोलावत संबंधित प्रकरणाची माहिती घेतली. व तत्काळ शिक्षकांना शाळेवर जाण्याचे आदेश दिले.

ग्रामस्थांनी लक्ष घालण्याची गरज

गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक रोज येतात की नाही, तसेच आल्यानंतर ते शिकवणी करतात की नाही याची चाचपणी गावकऱ्यांनी करायला हवी. तसेच ग्रामसभेला यात संदर्भात सर्वाधिकार दिले असून त्यांनी तो अधिकार वापरावे, तरच शिक्षक हे पूर्ण वेळ शाळेत राहून अध्यापनाचे काम करतील. यासाठी गावकऱ्यांनी आपल्या मुलांसाठी शाळेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

येत्या आठ दिवसात सर्व शिक्षक जर हजर झाले नाही तर विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसणार.

- सय्यद कलीम कोदन, माजी झेडपी सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT