Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

आपण औरंगजेबाचे वंशज नाही, तांत्रिक अडचणी दूर करून औरंगाबादचे नाव बदला

प्रकाश बनकर

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत आम्ही विजय मिळवणारच असे सांगत, शहराचं नाव संभाजीनगर व्हायलाच हवं, आपण सगळे शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे वंशज आहोत, आपण औरंगजेबाचे वंशज नाहीत, त्यामुळं तांत्रिक अडचणी दूर करून नाव बदलायला हवं, असा सूचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनाला लगावला.

चंद्रकांत पाटील औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दिवसभर मॅरेथॉन बैठका घेत आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, ''महापालिका निवडणुकीत ताकद लावली तर आम्हाला संधी आहे, म्हणून  शहरात आलोय. बैठका घेत आहे. शेतकरी कर्जमाफी म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, अशी स्थिती आहे. ही फक्त घोषणा आहे, मनापासून नाही.''

''आता म्हणतात, ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे यादी जाहीर करता येणार नाही. मग जे कायदे या आठवड्यात केले, ते सगळे रद्द करा. सरपंच निवड कायदा, बाजारसमिती निवडणूक कायदा हे सगळे कायदे रद्द करावे, आम्ही राज्यपालांना निवेदन दिलेय,'' असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

गुंड बिळातून बाहेर पडले

पाथर्डी येथील शेतकरी आत्महत्या दुर्दैवी आहे, शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न केले. त्यांना मदत करायला हवी, आमच्या सरकारने केलं, जोपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही, भाववाढ मिळणार नाही, तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

गंगापूरमध्ये छेडछाडीच्या घटना झाल्या. हे प्रकार आता वाढतच आहेत. आमच्या सरकारने भरपूर काम केलं, मात्र आता हे सगळं विस्कळीत झालं आहे, कायद्याचा धाक उरला नाहीये, गुंड बिळातून बाहेर पडले आहेत. आम्ही उद्धवजींना म्हटले की, गृहखाते तुमच्याकडे ठेवा, मात्र कुणालाच इंटरेस्ट नाही, असं चित्र असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT