andolan Aura.jpg
andolan Aura.jpg 
छत्रपती संभाजीनगर

विद्यार्थ्यांनी फोडले 'अच्छे दिन' चे फुगे ! 

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेलफेयर असोसिएशनतर्फे आंबेडकरी विद्यार्थ्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात 'फेकू दिवस' म्हणून साजरा केला. अच्छे दिनचा फुगा फुटल्याने खोटेपणाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'अच्छे दिन' चे फुगे फोडण्यात आले. पंतप्रधानांनी गेल्या सहा वर्षात घोषणा फसव्या करत देशाला अधोगतीला नेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. फेकू दिवस साजरा करुन सरकारविरोधातील संताप व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन दिवसभर औरंगाबादेत चर्चेचा विषय बनला होता. 

आंदोलनात विविध आश्वासनांचा उल्लेख असलेले काळ्या रंगाचे फुगे फोडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. प्रतिकात्मक स्वरूपाच्या या अनोख्या आंदोलनात पंतप्रधानांचा मुखवटा असलेल्या व्यक्तीकडून विविध फसव्या घोषणांचे फुगे फुगवण्यात आले. विविध उद्योजकांची नावे धारण केलेले युवक उभे करण्यात आले होते. यात तरुण अच्छे दिनचा व केंद्राच्या आश्वासनांचे फुगे फोडत असल्याचा सजीव देखावा साकारत, अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला.

यावेळी केंद्राच्या अच्छे दिन, सबका साथ सबका विकास, स्मार्ट सिटी, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करणार, प्रतिवर्षी २ कोटी रोजगार निर्मिती करणार, स्वछ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, घसरलेला जीडीपी, शेतीमालाला हमी भाव देण्याची घोषणा, शेतकरी कर्जमाफी, सरकारी शाळांचा घसरलेला स्थर, ठप्प झालेली जनधन-मुद्रा योजना, वन रँक वन पेन्शन योजना, भारताची अर्थव्यवस्था ३ ट्रेलियन डॉलर पर्यंत वाढविण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा, स्विस बँकेतील काळेधन परत आणणार, ग्राम सडक योजना, स्वस्त दरात इंधन देण्याची घोषणा, स्वस्त दरात वीज, अल्पभूधारक-कोरडवाहू शेतकऱ्यांची कर्जमाफी, या सर्व घोषणा आता हवेत विरून गेल्याने प्रत्येक योजनेचे नाव घेत अच्छेदिन च्या नावे फुगविलेले फुगे फोडण्यात आले. 

यावेळी सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, ॲड. अतुल कांबळे, शाहीर चरण जाधव, अशोक मगरे, शैलेंद्र म्हस्के, महेंद्र तांबे, अविनाश कांबळे, सागर प्रधान, स्वप्नील गायकवाड, विशाल इंगोले, सुबोध जोगदंड, अविनाश डोंगरे, प्रवीण हिवराळे, सतीश शिंदे, दिनेश गावळे, दीपक जाधव, सचिन जगधने, विशाल धापसे, दिनेश नवगिरे, दिलीप तडवी, कपिल बनकर, विशाल रगडे, राहुल खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT