Corona Test sakal media
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद: ऑक्टोबर ते डिसेंबर तीन महिने चिंतेचे

कोरोना संसर्ग : केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार असा अंदाज वारंवार व्यक्त केला जात आहे. आता तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर हे तीन महिने चिंतेचे असतील, असा इशारा केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिला आहे. तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेपेक्षा दीडपट रुग्ण गृहित धरून तयारी करण्याची सूचना त्यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यातील सर्व महापालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची नुकतीच ऑनलाइन पद्धतीने बैठक घेतली. याविषयी महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, बैठकीत तिसऱ्या लाटेसंदर्भात ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर हे तीन महिने चिंतेचे असतील असे सचिवांनी सांगितले.

एकाच दिवसात करोनाबाधित आढळण्याचे प्रमाण दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत दीडपटीने जास्त असण्याची शक्यता आहे, त्यानुसार नियोजन करा अशी सूचना करण्यात आली. विशेषतः दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल झाले, ही बाब लक्षात घेऊन ऑक्सिजनचा साठा पुरेसा साठा उपलब्ध असेल, अशी तयारी करण्याची सूचना यावेळी करण्यात आल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

औरंगाबादच्या शेजारी नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच ग्रामीण भागात गंगापूर, वैजापूर तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरात दोन आठवडे दक्षता घ्यावी लागणार असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी नमूद केले.

लसीकरणासाठी डॉक्टर, केली नर्सची मागणी

सध्या महापालिकेकडे लसींचा मोठा साठा आहे. पण नागरिकांचा लस घेण्यासाठी उत्साह नसल्याचे चित्र आहे. दरम्यान कोरोना संसर्गासाठी कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलेले डॉक्टर, कर्मचारी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या लसीकरण केंद्रांची संख्या देखील कमी झाली आहे. त्यामुळे घाटी रुग्णालय व एमजीएम रुग्णालयाकडून प्रत्येकी वीस आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टर्स व नर्सिंग कॉलेजकडून नर्स महापालिकेने मागवले आहेत, ते प्राप्त होताच लसीकरण केंद्रांची संख्या वाढवली जाईल, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT