अत्याचारप्रकरणी अटक sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : तोंडोळी अत्याचारप्रकरणी आणखी दोघे अटकेत

घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच २१ ऑक्टोबररोजी मुख्य सुत्रधारास बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : तोंडोळी (ता. पैठण) शिवारात दरोडा टाकून अत्याचार केल्याप्रकरणात आणखी दोघांना सोमवारी (ता.२५) ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे १९ ऑक्टोबररोजी घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच २१ ऑक्टोबररोजी मुख्य सुत्रधारास बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. अटक केलेले दोघे मुख्य सुत्रधाराचे विश्वासू साथीदार असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्या तिघांनाही पैठण न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आता या प्रकरणात एकूण ५ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी तपासासाठी एकूण ११ पथके स्थापन केली होती. सध्या सहा पथके तैनात असून त्यामध्ये ४ खास पथकांचा समावेश आहे. पैठण उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल हे अधिकारी दिवसरात्र या तपासाकामी पथकांना मार्गदर्शन करत आहेत.

दरम्यान खास पथकाने सोमवारी (ता.२५) दोघांना बेड्या ठोकल्या. नंदू भगिनाथ बोरसे (३५, रा. पालखेड, ता.वैजापूर) आणि अनिल भाऊसाहेब राजपूत (२९, मांजरी, ता. गंगापूर) अशी त्या दोघांची नावे आहेत.

मराठवाड्यात धुमाकूळ

तोंडोळी प्रकरणातील आरोपींनी अत्याचार केल्याचे समोर आले खरे, मात्र या टोळीने मराठवाड्यातही दरोडे टाकून धुमाकूळ घातल्याची माहिती मिळाल्याचे सुत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. या आरोपींनी मराठवाड्यात तब्बल १५ ठिकाणी दरोडे टाकले आहेत. सर्व आरोपी अटक झाल्यानंतर त्यांच्याकडून आणखी माहिती उघड होईल, असेही सुत्रांनी सांगितले.

वैर असलेल्यांची सांगतात नावे!

या प्रकरणातील आरोपी इतके चतूर आहेत की, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नाव, गाव विचारल्यानंतर खरी माहिती देत नाही, तर चक्क आरोपींचे ज्या व्यक्तींशी वैर आहे, त्यांचेही नावे सांगितल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर निष्पन्न झाल्यानंतरच अटकेची कारवाई करण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

अशी आहे अटकेची मालिका

२१ ऑक्टोंबर - प्रभू श्माम पवार याला अटक

२२ ऑक्टोबर - विजय प्रल्हाद जाधव

२४ ऑक्टोंबर - सोमनाथ बाबासाहेब राजपूत

(तिघा आरोपींना २८ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे)

२५ ऑक्टोंबर - नंदू भगिनाथ बोरसे आणि अनिल भाऊसाहेब राजपूत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

Manoj Jarange Patil: "विषय फिट बसला!" 58 लाख नोंदींवर जरांगेंचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT