aurangabad university sakal media
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : नालंदा गृहनिर्माण संस्थेसंदर्भात विद्यापीठाकडून दिशाभूल

मागासवर्गीय संस्था असल्याने त्रास देत असल्याचा आरोप

अनिल जमधडे

औरंगाबाद : नियोजित नालंदा गृहनिर्माण संस्थेच्या (Nalanda Housing society) भावसिंगपुरा सर्वे नंबर ३४ मधील जमिनीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) दिलेल्या निकालासंदर्भात विद्यापीठाने (university) दिशाभूल केली. प्रेसनोट काढून माध्यमांना चुकीच्या बातम्या दिल्या, विद्यापीठ वैयक्तीक पातळीवर जाऊन जाणिवपूर्वक मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेला टार्गेट करत असल्याचा आरोप नालंदा संस्थेचे मुख्य प्रवर्तक महेंद्र ठोंबरे (Mahendra thombare) यांनी पत्रकार परिषदेत केला.

सर्वोच्च न्यायालयातील सिविल अपील क्र. १२३०/२०२२SLP c no१०४५of २०२२ विद्यापीठ विरुद्ध नालंदा संस्थेचा निकाल ८ फेब्रुवारीरोजी लागला. मात्र, विद्यापीठाने ऑर्डर येण्यापूर्वी घाईघाईने प्रेसनोट काढून माध्यमांची दिशाभूल केली. विद्यापीठाने सर्वोच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी याचिका दाखल केली होती.

त्यावर सर्वोच्च न्यायालयाने नालंदा संस्थेकडे खालचे न्यायालय असाताना थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करू नका. मेरीटवर ऑर्डर करु किंवा आम्ही लिबर्टी देतो, तुम्ही खंडपीठाची याचिका मागे घ्या, असे दोन पर्याय दिले, त्यानुसार संस्थेने दुसरा पर्याय स्वीकारला. सर्वोच्च न्यायालयाने संस्थेला खालच्या कोर्टात न्याय मागण्यासाठी लिबर्टी दिली आहे. त्यामुळे नालंदाची याचिका फेटाळली, असे म्हणण्याचा विद्यापीठाला कुठलाही अधिकार नाही. तरीही विद्यापीठाने दिशाभूल करण्याचा खटाटोप केला असल्याचा आरोप श्री. ठोंबरे यांनी केला.

अशी आहे वस्तुस्थिती

भावसिंगपुरा सर्वे नं. ३४ मध्ये विद्यापीठाची २५ एकर २९ गुंठे आणि नालंदाची सहा एकर तर पंचशील गृहनिर्माण संस्थेची दोन एकर अशी ३३ एकर २९ गुंठे अशी एकूण जमीन आहे. विद्यापीठाने दोन्ही संस्थेच्या आठ एकरावर अतिक्रमण केलेले आहे. दोन्ही संस्थेकडे पीआर कार्ड आणि मालकीचे सर्व कागदपत्र आहेत. आमच्या खरेदीने घेतेलेल्या जागेवर विद्यापीठाने बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले, असा आरोप श्री. ठोंबरे यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाने संस्थेच्या मालकी आक्षेप घेतलेला नाही. म्हणजेच संस्थेचा मालकी हक्क अबाधित आहे. विद्यापीठाकडून जाणिवपूर्वक जातीय भावनेतून मागासवर्गीय संस्थेला डावलण्याच्या दृष्टीने हेतुतः प्रयत्न होत असल्याचा आरोप श्री. ठोंबरे यांनी केला. पत्रकार परिषदेला विठ्ठलराव नवगीरे, मनिषा ठोंबरे, प्रशांत साळी, संजय देसरडा, रवी बनकर, समाधान ठोंबरे, शाहीद शेख, आनंद जगधने आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT