Aurangabad Latest News 
छत्रपती संभाजीनगर

वीजतार पडून लागलेल्या आगीत वाहनासह देशीदारूचा कोळसा, चालक बालंबाल बचावला

संतोष शिंदे

पिशोर (जि.औरंगाबाद) : पिशोर (ता.कन्नड) येथून जवळच असलेल्या डोंगरगाव शेलाटी फाट्यानजीक नाचनवेल रस्त्यावर देशीदारूने भरलेला टेम्पो विजेच्या खांबावर आदळून वीज तार पडून लागलेल्या आगीत वाहनासह संपूर्ण देशीदारूचा कोळसा झाल्याची घटना रविवारी (ता.28) दुपारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी टेम्पोमधून (एमएच 20 डीई 4251) चिंचोली व भराडी येथील दुकानासाठी देशीदारू भरून बाबरा-नाचनवेल रस्त्यावरून जात असताना डोंगरगाव-शेलाटी फाट्यानजीक असलेल्या वळणावर चालक गणेश कळम याचा टेम्पोवरील ताबा सुटला.

रस्त्याच्या कडेला विजेचा पुरवठा करणाऱ्या मुख्य खांबावर टेम्पो जाऊन आदळला. यामुळे विद्युत वाहकतारा तुटून टेम्पोवर पडल्या. खोक्यातील काही बाटल्या फुटलेल्या असल्याने तार पडताच काही क्षणातच दारूने पेट घेतला. चालक कदम याने प्रसंगावधान राखून वाहनातून उडी घेतली. यामुळे चालक बालंबाल बचावला. बघता-बघता संपूर्ण दारूच्या पेट्यासह वाहनाचा कोळसा झाला.

पिशोर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य, सहायक फौजदार माधव जरारे, चालक सरवर पठाण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. देशीदारू पुरवठादार नरेंद्र जैस्वाल हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. या आगीत सुमारे दहा लाखांची देशी दारू तसेच टेम्पो असे सुमारे तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल भस्मसात झाल्याचे श्री.वैद्य यांनी सांगितले. पिशोर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Summer Heat Increase : राज्य आता ‘रेड’झोनमध्ये; उष्णतेच्या लाटेचा प्रकोप वाढला

PNG Gas Connection : महिनाभरात १४ हजार जोडण्या; ‘पीएनजी’ बंधनकारक केल्याने मागणीत तिप्पट वाढ

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी 'Orange Cap'च्या शर्यतीत पाचव्या स्थानावर फेकला गेला, पुढे चार स्टार फलंदाज; RCBच्या विजयाने इथेही उलटफेर

अग्रलेख : प्राणघातक झिंग

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 एप्रिल 2026

SCROLL FOR NEXT