baby-1.jpg 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : कपाशीच्या शेतात आढळले नवजात अर्भक  

रमेश राऊत

शिऊर (जिल्हा-औरंगाबाद) : सावखेड (खं) (ता. वैजापूर) फाट्याजवळील शेतात शुक्रवारी (ता.७) सकाळी नवजात अर्भक (पुरुष जातीचे) सापडल्याने परीसरात एकच खळबळ उडाली. गट नं.३०३ मधील कपाशीच्या शेतात अज्ञाताने गोंडस बाळाला टाकून पळ काढला. 

परीसरातीलच शेतीकामा निमित्त गेलेल्या शेतकऱ्यांना बालकाचा रडण्याचा आवाज आला. त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता साधारण तीन-चार तासाचे पुरुष जातीचे नवजात अर्भक उघड्या अवस्थेत दिसले. त्याच्या आजूबाजुला दोन कुत्री देखील दिसली. त्यावेळी शेतकरी घाबरून गेला. बाळाच्या अंगा, खांद्याला व चेहऱ्याला मातीने माखलेले होते. प्रथम हे दृश्य पाहून ते भांबावले. त्यांनी घटनेची कल्पना ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब काळे, पोलीस पाटील शिवाजी पवार यांना दिली. त्या बाळाला कपड्यात गुंडालळे. तोपर्यंत गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती शिऊर पोलीसांना देण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र जाधव, सुभाष बकले, रमेश टोम्पे, भारत तमणर, बालाजी कोणगीरवार, आळणे मॅडम आदींनी त्या गोंडस बाळास (शिशु) घटनास्थळावरून ताब्यात घेऊन दुध पाजून चांगल्या कापडात गुंडाळून महिला पोलीस कर्मचारी आळणे मॅडम, भुरे मॅडम यांच्या ताब्यात दिले. 

शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळाची तपासणी करून औरंगाबादच्या (घाटी) शासकिय रुग्णालयात त्यास हलविण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार बालसंगोपण केंद्रात दाखल करण्याची प्रक्रिया शिऊर पोलीस ठाण्यात सुरु होती. 

संपादन-प्रताप अवचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT