एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती; प्रशासनाचे दुर्लक्ष
एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती; प्रशासनाचे दुर्लक्ष  sakal
छत्रपती संभाजीनगर

वाळूज : एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती; प्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

वाळूज : वाळूज ते जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान एमआयडिसीला पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनला नगर औरंगाबाद महामार्गावरील नायगावच्या बकवालनगरलगत गळती लागली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मागील अनेक महिन्यांपासून गळती होणाऱ्या पाण्याकडे एमआयडिसी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

त्यामुळे, आश्चर्य व्यक्त होत आहे. 1982 मध्ये एमआयडिसी प्रशासनाने ब्रम्हगव्हाण ते वाळूजचे जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान पाईपलाईन टाकली. वाळूज मार्गे टाकण्यात आलेल्या पाईपलाईनव्दारे पाणी आणुन ते वाळूज औद्योगिक वसाहतीतील विविध कारखाने तसेच परिसरातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. या पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईनला नगर औरंगाबाद महामार्गावरील नायगाव बकवालनगरलगत गळती लागली आहे.

या ठिकाणी रस्ता असल्याने अंदाजे 20 फुट पाईपलाईन भुमीगत आहे.मात्र त्यावरून जड वाहतूक होत असल्याने पाईपलाईन मोठ्या आकारात फुटल्याने अगदी सात फुट उंच पाणी उडत आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. वास्तविक पहाता परिसरात कायम एमआयडिसी प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा वावर असतो. मात्र, पाणी गळतीकडे संबंधीतांचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.ही पाणी गळती तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी रमेश आरगडे, शंकर राठोड यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT