Why all works on SSC board closed till 31st
Why all works on SSC board closed till 31st 
छत्रपती संभाजीनगर

एसएससी बोर्डातील सर्व कामे ३१ तारखेपर्यंत बंद 

संदीप लांडगे

औरंगाबाद ः विभागीय शिक्षण मंडळ (एसएससी बोर्ड) येथे मंगळवारपासून ५ टक्के कर्मचाऱ्यांवर काम करण्यात येणार असून, सोमवारपासून अभ्यागत अर्थात बाहेरुन येणाऱ्या जाणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत अभ्यागतांना येता येणार नाही. त्यामुळे बोर्डातील इतर कार्यालयीन कामे ३१ तारखेपर्यंत बंद असणार असल्याची माहिती विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्डची परीक्षा संपली असून, उत्तरपत्रिका तपासणीचे कामही पूर्ण होत आले आहे. तर दहावी एक पेपर होणे बाकी आहे. मात्र जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला आहे. तर महाराष्ट्रातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ५ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

तसचे आवश्यकता असल्यासच येणाऱ्या-जाणाऱ्यांनी कार्यालयात यावे असे सांगत गर्दी कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र असे असतांनाही लोकांची गर्दी कमी होतांना दिसत नाही. त्यामुळे विभागीय शिक्षण मंडळाने सोमवारी गेटवर नोटीस लावली आहे की, कोरोना चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अभ्यागतांनी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत नाव दुरुस्ती, जन्म दिनांक दुरुस्ती, द्वितीय गुणपत्रक, प्रमाणपत्र, स्थलांतर प्रामणपत्र, तात्पुरते प्रमाणपत्र यासाठीचे प्रस्ताव आदी तसेच अन्य कोणत्याही कामासाठी कार्यालयात येऊ नये असे म्हटले आहे. 

विभागाची द्वितीय सभा रद्द
कोरोनाचा संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी 31 मार्च पर्यंत उत्तरपत्रिका मंडळ कार्यालयात जमा करण्याचे (द्वितीय सभेचे) वेळापत्रक स्थगीत करण्यात आले आहे. उत्तरपत्रिका मंडळ कार्यालयात जमा करण्याबाबतचे नवीन वेळापत्रक 31 मार्चनंतर कळविण्यात येणार असल्याचे बोर्डाने कळविले आहे

पाच एप्रिलनंतर भूगोलचा पेपर 
महाराष्ट्र शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पाचवी ते आठवीच्या परीक्षा रद्द करुन शाळांना सुट्या दिल्या आहेत. याचा परीणाम दहावीच्या परीक्षांवरही झाला. दहावीचा उर्वरीत शेवटचा राहिलेला भूगोल विषयाचा पेपर हा ५ एप्रिलनंतर होण्याची शक्यता असल्याचे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगीतले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अमित शहांनी बोरिवलीमध्ये भाड्याने घर घेतलंय- संजय राऊत

IPL 2024 DC vs RR : राजधानी 'दिल्ली'साठी आर या पार...! प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी आज राजस्थानवर विजय आवश्यक

SCROLL FOR NEXT