file photo 
छत्रपती संभाजीनगर

जिल्हा परिषद शाळांत पडणार सौरदिव्यांचा लख्ख प्रकाश

मधुकर कांबळे

औरंगाबाद - वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांची वीज कट झालेली आहे. त्यामुळे या शाळांची संगणक यंत्रणा बंद आहे. यातुन मार्ग काढण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर ५० शाळांमध्ये सौर दिवे लावण्यात येणार आहेत.

अनेक जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल थकलेले असून, काही ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातून वीज बिल भरलेले आहे. वीज बील थकल्याने शाळेची वीज कट होण्याच्या कटकटीतुन कायमचा उपाय शोधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

त्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ४ शाळांसाठी १ किलो वॅटची ५० हजारांपर्यंतची सोलार सिस्टीम बसविण्यात येणार आहे. ४ खोल्यांपेक्षा जास्त खोल्या असलेल्या शाळांमध्ये २ किलो वॅटची एक लाख रुपयांची सिस्टीम बसविण्यात येणार आहे. 

ही सोलार सिस्टीम बसविल्यानंतर या शाळातील अंधार दूर होणार असून, संगणक यंत्रणाही सुरू होणार आहे. या योजनेंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर ५० शाळा जोडण्यात येणार असल्याचे जिल्हा परीषदेचे शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

Patna Mother Murder : मुलानेच आईला जिवंत जाळलं; पोलिसांना म्हणाला- ‘मी देवाचा अवतार, कलियुग सुरूय, मीच तिला संपवलं'

Marathi News Live Updates : ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयात धाव; TMC नाव आणि पारंपरिक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान

Badrinath Military Exhibition : बदरीनाथमध्ये मुख्यमंत्र्यांचा रायफल हातात घेत नेमबाजीचा सराव; लष्करी प्रदर्शनाची घेतली पाहणी

SCROLL FOR NEXT