file photo
file photo 
छत्रपती संभाजीनगर

आरोग्य विभागात ५२७ कंत्राटी पदांची होणार भरती 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - कोरोनाशी लढा देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे कोरोनाच्या प्रतिबंधासाठी अडचणी येऊ नयेत यासाठी कोविड-१९ आजाराच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेकडून ५२७ कंत्राटी पदे भरली जाणार आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी थेट मुलाखती होणार आहेत. 

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर, सामान्य रुग्णालयस्तर व उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात ही पदे भरली जाणार आहेत. ही सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची असून, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आहे व कोरोना साथ संपेपर्यंत किंवा नियुक्ती प्राधिकारी ठरवतील तोपर्यंत सदर नियुक्ती अस्तित्वात राहतील. अपेक्षित शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर अटी व शर्तींविषयी सविस्तर जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
विविध पदांसाठीची सविस्तर माहिती http://www.aurangabadzp.gov.in या संकेतस्थळावर पाहायला मिळेल. थेट मुलाखती एक एप्रिल ते आठ एप्रिल या कालावधीत शासकीय सुट्या वगळून सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळात होणार आहेत. या थेट मुलाखती जिल्हा परिषद औरंगाबाद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात होणार आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

इच्छुक उमेदवारांनी दिनांक एक एप्रिलला थेट मुलाखतीसाठी आरोग्य विभाग जिल्हा परिषद औरंगाबाद कार्यालयात सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा
 
कंत्राटी तत्त्वावर भरावयाची पदे 
 

  • वैद्यकीय अधिकारी -१७०
  • आरोग्यसेवक महिला- १८७ 
  • आरोग्यसेवक पुरुष- ६० 
  • स्टाफ नर्स- ११० 
  •  
  •  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT