औरंगाबाद : ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर टाळा गर्दी sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर टाळा गर्दी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासनाकडून मार्गदर्शक

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या ओमिक्रॉनमुळे नवीन धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी होईल असे कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम टाळणे अपरिहार्य झाले आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी (ता. सहा) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर मुंबई व औरंगाबाद जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना जारी करून गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून कोविड -१९ च्या पार्श्‍वभूमीवर ब्रेक द चेनअंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापरिनिर्वाण दिन हा भारतीयांसाठी गांभीर्याने पालन करावयाचा असून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे ओमिक्रॉनमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाणदिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे. तसेच शासनातर्फे चैत्यभूमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे न येता घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.

चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी जाणाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण बंधनकारक करण्यात आले आहेत. थर्मल स्क्रिनिंगमध्ये ज्यांच्या शरीराचे तापमान सर्वसाधारण असेल त्यांनाच कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही याची खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT