crime news crime news
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून

गेल्या वर्षी वडगाव (को.) येथील योगेश प्रधान या तरुणाच्या खून प्रकरणातही त्याचा सहभाग होता

रामराव भराड

वाळूज (औरंगाबाद): हर्सुल कारागृहातून जामीनावर सुटलेल्या गुन्हेगाराचा अज्ञात आरोपींनी दगडाने ठेचून खून केल्याची घटना बजाजनगर (bajajnagar crime) येथे शुक्रवारी (ता.२१) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. हॉटेल मृगनयनीसमोर शुक्रवारी (ता.२१) रात्री १० वाजेच्या सुमारास हाणामारी होत असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार, उपनिरीक्षक अधाने, पोलीस काँस्टेबल अविनाश ढगे, विनोद नितनवरे, रमेश गायकवाड, अशोक दाभाडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

तेथे एक अनोळखी तरुण दगडाने ठेचलेल्या व रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्याचे पोलिसांना दिसले. त्यास पोलिसांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. त्याचे नाव विशाल किशोर फाटे (२७) रा.वडगाव (कोल्हाटी) असे आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

गेल्या वर्षी वडगाव (को.) येथील योगेश प्रधान या तरुणाच्या खून प्रकरणातही त्याचा सहभाग होता. तेव्हा पासून विशाल कारागृहात होता. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच विशालची जामिनावर सुटका झाल्याने तो वडगावला आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्वारीच्या कोठारात यंदा हरभरा-करडईची पेरणी! अतिवृष्टीमुळे मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना ५७० कोटींचा फटका; ऑक्टोबर उजाडला तरी नाही 'मालदंडी'ची पेरणी

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला जाताय? तर चुकूनही विसरू नका 'या' 2 गोष्टी, नाहीतर स्वतःचं नुकसान करून घ्याल..!

आजचे राशिभविष्य - 07 ऑक्टोबर 2025

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT