sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : ‘ईएमआय’वरून तिघांना मारहाण ; रांजणगाव शेणपुंजी येथील घटना, चौघांविरुद्ध गुन्हा

मोबाइलचे ‘ईएमआय’ न भरल्यामुळे कर्जपुरवठा करणाऱ्या कंपनीने तो बंद केला. त्यामुळे मोबाइल घेऊन देणाऱ्यासह तिघांना बेदम मारहाण करून डोके फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. ही घटना रांजणगाव शेणपुंजी येथे घडली.

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : मोबाइलचे ‘ईएमआय’ न भरल्यामुळे कर्जपुरवठा करणाऱ्या कंपनीने तो बंद केला. त्यामुळे मोबाइल घेऊन देणाऱ्यासह तिघांना बेदम मारहाण करून डोके फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. ही घटना रांजणगाव शेणपुंजी येथे घडली.

पोलिस तक्रारीचा आशय असा ः रांजणगाव (शेणपुंजी) येथील भगवान देवराव घुगे यांच्याकडे बाबासाहेब शिंदे (रा. रांजणगाव) मुलगा ओमकार यास मोबाइल फोन घेऊन देण्याचा तगादा लावला. घुगे यांनी एका फायनान्स कंपनीकडून स्वत:च्या नावे १६ हजारांच्या कर्जावर ओमकार यास मोबाइल घेऊन दिला. दरम्यान, ओमकारने केवळ एकच ईएमआय भरला.

त्यामुळे कंपनीने मोबाइल बंद केला. यावरून ओमकार, त्याची आई सुरेखा आणि दोन अनोळखी तरुण घुगे यांच्या घरी गेले. सुरेखा शिंदे यांनी घुगे यांना ‘तुम्ही फायनान्स कंपनीला सांगून माझ्या मुलाचा मोबाइल का बंद केला?’ या कारणावरून शिवीगाळ करीत घुगे यांना मारहाण केली. यावेळी आशामती आणि मीरा आघाव हे मदतीसाठी आले असता त्यांनाही मारहाण केली. या प्रकरणी भगवान घुगे यांच्या फिर्यादीवरून सुरेखा शिंदे, ओमकार शिंदे आणि दोन अनोळखी तरुणाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT