Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Beed Crime : मला कशाची आरती देता म्हणत डॉक्टर मुलानं डोक्यात खलबत्ता घालून बापाचा केला खून

आयुर्वेदात पदव्युत्तर पदवीचे (Ayurveda Degree) शिक्षण घेत असलेल्या मुलाने वडिलांचा खून केला.

सकाळ डिजिटल टीम

आयुर्वेद शाखेतील पदवी घेतलेला सुधीर कुलकर्णी तीन वर्षांपासून याच विषयात पदव्युत्तर पदवीचे (एमडी आयुर्वेद) शिक्षण घेत होता.

बीड : आयुर्वेदात पदव्युत्तर पदवीचे (Ayurveda Degree) शिक्षण घेत असलेल्या मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील अंकुशनगर भागात बुधवारी सकाळी उघडकीस आली. सुरेश काशिनाथ कुलकर्णी (वय ७०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सुधीर सुरेश कुलकर्णी (वय ३८) असे संशयिताचे नाव आहे. सुमारे तेरा वर्षांपूर्वी आयुर्वेद शाखेतील पदवी घेतलेला सुधीर कुलकर्णी तीन वर्षांपासून याच विषयात पदव्युत्तर पदवीचे (एमडी आयुर्वेद) शिक्षण घेत होता. त्यात अपयश आल्याने तो नैराश्यग्रस्त होता.

दरम्यान, त्याच्या आई- वडिलांनी काल रात्री घरी आरती केली. आरती घेऊन वडील सुधीरकडे गेले. 'मला कशाची आरती देता' असे म्हणून त्याने वडिलांशी भांडण केले. त्यानंतर त्याने लोखंडी खलबत्ता वडिलांच्या डोक्यात मारला. त्यात वडील गंभीर जखमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पळ काढला.

जखमी सुरेश कुलकर्णी यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. आई सुरेखा कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा सुधीर कुलकर्णी याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला. पोलिस निरीक्षक केतन राठोड तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Breakfast Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट रेसिपी; १५ मिनिटांत बनवा मऊ, स्पंजी उपवासाची इडली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT