बीड : मामाच्या मुलासोबत प्रेमसंबंध असलेल्या अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची घटना घोसपुरी (ता. बीड) येथे शनिवारी (ता. २३) रात्री घडली. याबाबत बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन केले. मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. घटनेनंतर मृत मुलीच्या प्रियकराने विष घेतल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घोसपुरी येथील मृत मुलीचे तिच्याच मामाचा मुलगा भगवान वैजनाथ गायकवाड (वय १९) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. भगवान व्यसनाधीन असल्याने त्याच्यासोबत लग्न करू नको, यासाठी नातेवाइकांचा लग्नाला विरोध होता. यातूनच भगवान याने टोकाचे पाऊल उचलत शनिवारी रात्री मुलीला गावाच्या बाहेर बोलावून घेऊन तिचा दगडाने ठेचून खून केला.
या घटनेनंतर त्यानेही विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता, त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शहाजी नायबा माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भगवानसह त्याचे वडील वैजनाथ माणिक गायकवाड, बाळू माणिक गायकवाड, रमेश गव्हाणे, अंकुश ऊर्फ भय्या विश्वनाथ माळी यांच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील वैजनाथ गायकवाड, अंकुश ऊर्फ भय्या माळी यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण प्रेमसंबंधातून घडले असून, लग्नासाठी नातेवाइकांच्या विरोधामुळे ही घटना घडली आहे. पुढील तपास सुरू असून, फरार तीन संशयित आरोपींना लवकरच अटक केली जाईल.
— शिवाजी बंटेवाड, पोलिस निरीक्षक, ग्रामीण पोलिस ठाणे, बीड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.