किल्ले धारुर (जि.बीड) : लसीकरण केंद्राची चावी न मिळाल्याने नागरिकांची गर्दी. 
छत्रपती संभाजीनगर

कोरोना लसीकरण केंद्राची चावी मिळेना, नागरिकांची तारांबळ!

किल्ले धारूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून चार ठिकाणी शासनाच्या वतीने लस केंद्र सुरू करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

किल्ले धारूर (जि.बीड) : किल्ले धारूर (Kille Dharur) शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले नगरेश्वर मंगल कार्यालयात मागील तीन दिवसांपासून लस सुरु आहे. मात्र चौथ्या दिवशी मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकांनी चावी न दिल्याने लस घेण्यासाठी आलेले नागरिक मंगल कार्यालयासमोर ताटकळत बसावे लागले. किल्ले धारूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून चार ठिकाणी शासनाच्या वतीने लस केंद्र (Corona Vaccination Site) सुरू करण्यात आले आहे. यात शहरात नागरिकांच्या सोयीसाठी मध्यवर्ती ठिकाणी असलेले नगरेश्वर मंदिरात लस सुरू करण्यात आली. मात्र नगररेश्वर मंदिर मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकाने चावी न दिल्याने नागरिक तब्बल एक तास ताटकळत बसल्याचे दिसून आले. (Beed Latest News Corona Vaccination Site Close For An Hour In Kille Dharur)

नगरेश्वर मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापकाने चावी न दिल्याने नागरिक एक तास वेठीस बसले असता जागरूक पत्रकारांनी तहसीलदार यांना तात्काळ कल्पना देताच तहसीलदार यांनी व्यवस्थापकांना सूचना देताच व्यवस्थापकांनी चावी देऊन लसकेंद्र सुरू केले.सध्या कोरोनाच्या महामारीच्या काळात जसे होईल त्या पद्धतीने फुल ना फुलांची पाकली या प्रमाणे मदत करताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे किल्ले धारूर शहरातील नगररेश्वर मंदिर मंगल कार्यालयांच्या लस केंद्राची व्यवस्थापकाने चावी न देऊन वेठीस धरल्याने नागरिक मंगल कार्यालयाच्या बाहेर ताटकळत बसावे लागले आहे. यामुळे या प्रकरणावर तहसीलदार कार्यवाही करतील का हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं मोठं पाऊल! मुदत संपलेल्या अन्नपदार्थांच्या पुनर्विक्रीबाबत नवे नियम लागू

BJP PM Candidate Announcement for 2029 : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा PM पदाचा चेहरा ठरला! बैठकीत अमित शाहांनी अचानक जाहीर केलं 'हे' नाव; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

China EV Crisis: चिनी इलेक्ट्रिक कारचा जगात डंका, पण मायदेशात ठणठणाट! चीनच्या ईव्ही उद्योगाचं गणित कसं बिघडलं?

IND vs NZ, 4th T20I: टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगिलतं; फिलिप्सचंही केलं भरभरून कौतुक

Marathi News Live Updates : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत रक्षा खडसेंना स्वकीयांचंच आव्हान; आमदार चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा!

SCROLL FOR NEXT