छत्रपती संभाजीनगर

माणुसकीची एैसीतैसी! मदत न करता कंटनेरमधील बिअरचे बाॅक्स पळविले

सकाळ डिजिटल टीम

वैजापूर (जि.औरंगाबाद) : करंजगावजवळ (ता.वैजापूर) (Vaijapur) मुंबई-नागपूर महामार्गावर रविवारी (ता.नऊ) रात्री वाळूजहून मुंबईकडे निघालेल्या बिअरने भरलेल्या कंटेनरला (एमएच ४६ बीएफ ५१२) (Beer) समोरुन येणारा ट्रक घासून गेल्याने कंटेनरचा एका बाजूचा पत्रा तुटला. यामुळे त्यातील बिअरचे १८०० बाॅक्स महामार्गावर पडले. काही वेळातच करंजगाव जवळचे ग्रामस्थ आणि (Accident In Aurangabad) ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी बिअरचे बाॅक्स पळवले. बिअरचा कंटेनर पूर्ण रिकामा झाला होता. जो-तो बिअर बाॅक्स लुटत होता. अपघातग्रस्त कंटेनरचालकाला वाचवण्यासाठी कोणाला वेळच नव्हता. एका गटाने त्यांना उपचारासाठी मदत केली.(beer carrier container accident in vaijapur tahsil of aurangabad, people looted beer boxes glp88)

अपघातस्थळी वैजापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक केळे, जमादार दिलीप वेलगोडे, जमादार किशोर आघाडे, गणेश पठारे यांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केले. मात्र पोलिस येईपर्यंत १८०० बिअरच्या बाॅक्सपैकी फक्त १५० बाॅक्स शिल्लक राहिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी २०० कोटींची तरतूद; राज्यात १० मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये पुन्हा बिबट्या दिसला

SCROLL FOR NEXT