Aurangabad News esakal
छत्रपती संभाजीनगर

कामगाराची आत्महत्या, व्हिडिओ व्हायरल करुन मारली विहिरीत उडी

तरुण कामगाराने वाळूज येथील नील ऑटोच्या व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

नवनाथ इधाटे

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : तालुक्यातील कविटखेडा येथील २९ वर्षीय तरुण कामगाराने वाळूज (Waluj) येथील नील ऑटोच्या व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.१६) सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली. तर कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करून त्यास त्वरित (Aurangabad) अटक करण्यात यावी या मागणीसाठी संतप्त नातेवाइकांनी अचानक औरंगाबाद- जळगाव महामार्गावर सुमारे अर्धातास रास्ता रोको आंदोलन केले. नंतर पोलिसांनी संबंधित व्यवस्थापकाविरुद्ध वडोद बाजार पोलिस ठाण्यात (Phulambri) गुन्हा नोंद केल्यानंतर विच्छेदन केलेला मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. शिवनाथ सखाराम कोलते (वय २९, रा. कविटखेडा, ह.मु.औरंगाबाद) असे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कविटखेडा येथील शिवनाथ कोलते हा वाळूज एमआयडीसी येथील नील ऑटो कंपनीत पाच वर्षांपासून कामाला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी तो कविटखेडा येथे आपल्या गावी आला होता.

शनिवारी सकाळी नऊ वाजता त्याने गावातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला. या व्हिडिओत सॉरी माझ्या मृत्यूस कंपनी व्यवस्थापक मनोज पवार हा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे सुसाईड नोटही लिहून ठेवली. घटनेची माहिती वडोद बाजार पोलिसांना मिळताच पोलिसांनी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात शिवनाथला दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. वडोद बाजार पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि विच्छेदनासाठी डॉक्टरांच्या स्वाधीन केला.

नातेवाइकांनी घेतला आक्षेप

पोलिसांच्या म्हणण्यानुसार नातेवाइकांनी शवविच्छेदनासाठी संमती देऊन परवानगी दिली. तशा गावातील पंचाच्या स्वाक्षऱ्याही पोलिसांनी घेतल्या. परंतु शिवनाथच्या मृत्यूस कंपनी व्यवस्थापक मनोज पवार हा जबाबदार आहे. त्यावर गुन्हा दाखल करून अटक करत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करायचेच नाही असे आम्ही सांगितले असतानाच शवविच्छेदन का केले? म्हणत अचानक संतप्त नातेवाइकांनी औरंगाबाद-जळगाव महामार्गावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयसमोर दुचाकी आडव्या लावून रास्ता रोको आंदोलन केले. घटनेची माहिती फुलंब्री पोलिस निरीक्षक अशोक मुगद्दीराज यांना मिळताच ते फौजफाट्यासह आंदोलनस्थळी हजर झाले. नातेवाइकांची समजूत घालून पोलिस कंपनी व्यवस्थापकाला ताब्यात घेतील. लवकरच त्याला अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. त्यानंतर रात्री मृतदेहाचे विच्छेदन करून तो नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. याबाबत वडोद बाजार पोलिस ठाण्यात नील ऑटो या कंपनीचे व्यवस्थापक मनोज पवारविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शरद पवार हे करीत आहेत. दरम्यान रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : पुण्यातील प्रभाग २९, ३० मतमोजणी केंद्रावर गोंधळ

KDMC Election Result 2026: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत कोणाची सत्ता? विजयी उमेदवारांची यादी समोर

Malegaon Municipal Result : मालेगावात भाजपाचा सुपडा साफ; पालिका हातातून गेली, इस्लाम पार्टीचा दणदणीत विजय, शिवसेनेला किती जागा?

Pune Municipal Results : पुण्यात मोठा राजकीय धक्का! प्रभाग 39 मध्ये गुंड बापू नायरचा पराभव, भाजपचा धडाकेबाज विजय

Nashik Election Result: नाशिकमध्ये माजी महापौर विरुद्ध माजी उपमहापौर रंगलेली लढत; अखेर कोणाच्या गळ्यात विजयाची माळ?

SCROLL FOR NEXT