Chandrakant Khaire And Bhagwat Karad esakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेतील विकास कामांवरुन खैरे-कराड समोरासमोर, श्रेयवादाचे राजकारण रंगले

त्यांनी वीस वर्षांत केलेले काम बघा, मी दोन वर्षात केलेले काम बघा !

प्रकाश बनकर

औरंगाबाद : मी दिल्लीत नवीन आहे. मला खासदार होऊन दोन वर्ष झाली. मात्र चंद्रकांत खैरे हे वीस वर्षें खासदार होते. त्यांनी वीस वर्षांत केलेले काम बघा, मी दोन वर्षात केलेले काम बघा, खैरे यांनाच खऱ्या अर्थाने दिल्ली कळलीच नाही. त्यांना कळली असती तर औरंगाबादेत (Aurangabad) उद्योग आले असते, असा खोचक टोला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी (ता.२५) शिवसेना नेते खैरेना लगावला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रविवारी जाबिंदा मैदानावर सोलापूर-धुळे महामार्ग क्रमांक ५२ चा लोकार्पण व चार महामार्गाच्या कामाचा भुमीपूजन सोहळ्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्याकडे मागण्या मांडताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली होती. (Bhagwat Karad Attack On Chandrakant Khaire For Development Works)

मी खासदार झाल्यानंतर कमी कालावधीत शहरासाठी महत्त्वाचे प्रकल्प मंजूर करून आणले. मात्र, आमचे जुने मित्र माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) नेहमी सांगतात की यासाठी मी आधी पत्र दिले होते. हे तर असे झाली की मुलगी पाहिली नाही, लग्नही केले नाही. नुसताच गाजावाजा करायचा अशी खरमिरीत टीका त्यांनी केली. त्या टीकेनंतर चंद्रकांत खैरे यांनीही प्रत्युत्तर देत मीच महामार्गाच्या कामासाठी पाठपुरावा केला. माझ्यामुळेच हा रस्त्याचे काम झाले. केद्रीय मंत्री नितीन गडकरी हे चांगले काम करीत आहे. त्यांच्यामुळेच या कार्यक्रमास आलो होतो, असे सांगत डॉ.भागवत कराड (Bhagwat Karad) हे दिल्लीत नवीन आहे. त्यांना अजून दिल्ली कळली नाही, मला एकाच दिवशी दिल्ली कळल्याची जोरदार प्रत्युत्तर दिले.

ऑरिक सिटी परिसरात झालेल्या कार्यक्रमानंतर डॉ. कराड यांनी माध्यमांशी संवाद साधताना खैरेंनाच दिल्ली कळली नसल्याचे सांगितले. डॉ.कराड म्हणाले की, मी नवीन आहे, दोन वर्षं मला खासदार होऊन झाले. ते वीस वर्ष खासदार होते. त्यांनी वीस वर्षांत केलेले काम बघा आणि मी दोन वर्षांत केलेले काम बघा, यामुळे खऱ्या अर्थाने दिल्ली त्यांना समजली नसावी किंवा मला दोन वर्षांत समजली नाही, हे त्यांना कळेल असा खोचक टोलाही कराड यांनी लागवला. त्यांनी वीस वर्षांत किती उद्योग आणले ते सांगावेत, असा सवाल डॉ. कराड यांनी खैरे यांना केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT