डॉ. कराड, आदर्श पतसंस्था घोटाळाप्रकरणी निर्देश sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : एकरकमी परतफेड योजना राबवा ; डॉ. कराड, आदर्श पतसंस्था घोटाळाप्रकरणी निर्देश

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यात १८५ कर्जदारांकडे तब्बल २५३ कोटींचे कर्ज थकले आहे. सहकार विभागाच्या माध्यमातून ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यात १८५ कर्जदारांकडे तब्बल २५३ कोटींचे कर्ज थकले आहे. सहकार विभागाच्या माध्यमातून ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात ज्या कर्जदारांनी तारण न ठेवता कर्जे उचलली, त्यांच्यावर गुन्हे नोंद करा आणि एकरकमी परतफेड योजना राबवा, असे निर्देश केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शनिवारी (ता. तीन) अधिकाऱ्यांना दिले.

आदर्श पतसंस्थेच्या घोटाळाप्रकरणी डॉ. कराड यांनी बैठक घेतली. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहकार आयुक्त अनिल कवडे, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, जिल्हा विशेष लेखा परीक्षक सु.प. काकडे, जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते, सहायक आयुक्त (गुन्हे) धनंजय पाटील, उपजिल्हाधिकारी (सामान्य शाखा) प्रभोदय मुळे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. विजय वीर, प्रशासक समितीचे सदस्य विष्णू रोडगे आदी उपस्थित होते. ‘‘ज्या कर्जदारांनी चुकीच्या पद्धतीने कर्ज उचलले त्यांची तपासणी करून नावे द्यावीत, त्यांच्याविरोधात तक्रार द्यावी, गुन्हे दाखल करण्यात येतील’’, असे लोहिया यांनी सांगितले. सहकार आयुक्त कवडे यांनी एकरकमी कर्ज परतफेड योजनेबाबत माहिती दिली.

खासदारांनी वसुलीतही मदत करावी

ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्यात, या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. त्यांनी केवळ आंदोलन न करता थकीत कर्जाच्या वसुलीसाठी प्रयत्न करावेत. या बैठकीला त्यांनाही बोलावण्याचा प्रयत्न झाला. परंतु, संपर्क न झाल्याने त्यांना बोलावण्यात आले नसल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

संस्थेत १ हजार ७०५ कर्जदार असून, ५ लाखांपर्यंत कर्ज असलेल्यांची संख्या १ हजार ३८५ आहे. त्यांच्याकडून १८ कोटी ८५ लाख तर ५ लाखांवरील कर्जदारांची संख्या ३२० आहे. त्यांच्याकडून २६४ कोटी ५३ लाख रुपये कर्ज वसूल करणे बाकी आहे. १ कोटीपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांची संख्या ३१ आहे. त्यांच्याकडून २१६ कोटी ५१ लाख रुपये वसूल करणे बाकी आहे. ज्या कर्जदारांनी योग्य तारण न ठेवता कर्ज उचलले त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश डॉ. कराड यांनी बैठकीत दिले.

- अनिल कवडे, सहकार आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO: मोठी बातमी! इस्रो आता प्रक्षेपण यान बनवणार नाही, जबाबदारी खाजगी कंपन्यांकडे; संशोधनावर लक्ष केंद्रित करणार

Jyotiraditya Scindia : जगातील निम्मे डिजिटल व्यवहार भारतात; ब्रिक्स देशांमध्ये डिजिटल सहकार्य वाढविण्यावर भर

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच पुण्यात राडा! काँग्रेस आणि ABVP चे कार्यकर्ते आमने-सामने; मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप

Chakan Traffic Issue : चाकण एमआयडीसीतील कोंडी फोडण्यासाठी ‘एआय’ आधारित कृती आराखडा!

Pune News : प्रसूतीच्या असह्य कळा... अन् ‘ती’ बनली रणरागिणी; वाहतूक कोंडीतून १९ वर्षीय तरुणीने गर्भवतीला नेले रुग्णालयात

SCROLL FOR NEXT