Bhokardan Bandh Bike Burnt esakal
छत्रपती संभाजीनगर

Bhokardan Bandh : मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; कारनंतर आता भररस्त्यात स्वत:ची दुचाकी जाळत सरकारला दिला इशारा

अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे.

दीपक सोळंके

धरणे आंदोलनादरम्यान एका आंदोलनकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वतःची दुचाकी पेटवून दिली.

भोकरदन (जालना) : अंबड तालुक्यातील अंतरावली सराटी येथे शुक्रवारी पोलिसांनी आंदोलकांवर (Jalna Police) केलेल्या लाठी हल्ल्याचे पडसाद तिसऱ्या दिवशीही तालुक्यात उमटले. आज, रविवारी पुकारण्यात आलेल्या भोकरदन (Bhokardan) बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याशिवाय तालुक्यातील अनेक ठिकाणी विविध आंदोलने (Jalna Maratha Reservation) करण्यात आली. या दरम्यान एका आंदोलकाने स्वतःची दुचाकी पेटवून देत निषेध व्यक्त केला. अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. हे आंदोलन शांततेत सुरू असतांना शुक्रवारी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटताना दिसून येत आहे.

या घटनेच्या निषेधार्थ दोन दिवसांपासून तालुक्यातील विविध भागात मराठा क्रांती मोर्चा, तसेच संतप्त सकल मराठा समाज बांधवांकडून निषेध व्यक्त करीत आंदोलने करण्यात येत आहे. रविवारी सकल मराठा समाजाच्यावतीने भोकरदन बंदची हाक देण्यात आली होती. या बंद दरम्यान व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत पाठिंबा दिला.

या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणावर सकल मराठा समाज बांधव जमा झाले होते. यादरम्यान अंतरावली सराटी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. गणपत दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मुख्य रस्त्यावर दुचाकी, टायर जाळली..

धरणे आंदोलनादरम्यान एका आंदोलनकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वतःची दुचाकी पेटवून दिली, तर काहींनी मुख्य रस्त्यावर टायरे जाळून निषेध व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT