Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

सव्वा दोन महिने घरातच पुरून ठेवला बापाचा मृतदेह, औरंगाबाद...

सकाळ वृत्तसेवा

कन्नड (जि. औरंगाबाद) - जामडी घाट (ता. कन्नड) येथे नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वडिलांचा खून करून त्यांचा मृतदेह घरातच पुरून ठेवल्याची घटना शनिवारी (ता. २९) उघडकीस आली. सव्वादोन महिन्यांपूर्वी म्हणजे ता. २२ डिसेंबरला घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

जामडी घाट येथील नामदेव चव्हाण (वय ४७) ही व्यक्ती साधारण सव्वादोन महिन्यांपासून बेपत्ता होती. दरम्यान, ता. २८ जानेवारीला नामदेव पोमा चव्हाण हे बेपत्ता असल्याची तक्रार पत्नी लताबाई नामदेव चव्हाण हिने कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती.

सव्वादोन महिन्यांपासून भाऊ बेपत्ता असल्याने किसन चव्हाण हेही बेचैन होते. म्हणून किसन चव्हाण यांनी मृताची पत्नी लताबाईसह नववीत शिकणाऱ्या मुलास विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी मुलाने सांगितले, की ता. २२ डिसेंबरला रात्रीच्या वेळी वडील नामदेव चव्हाण दारू पिऊन घरी आले होते. त्यावेळी आमच्यात भांडण होऊन वडिलांनी माझ्यावर कुऱ्हाडीने घाव घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मी वार चुकविला व स्वसंरक्षणासाठी काठी घेऊन ती वडिलांच्या मानेवर मारली. यामुळे वडील खाली कोसळले व ते बेशुद्ध पडले. मी घाबरून त्यांना दोरी घेऊन फाशी दिली व घरातच खड्डा खोदून त्यात त्यांचा मृतदेह पुरून विल्हेवाट लावली.

त्या जागेवर सारवून घेतले. त्यावेळी आई घरी नव्हती, असे मुलाने सांगितले. मृत नामदेव चव्हाण यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, चार भाऊ असा परिवार आहे.

चुलत्याने मायलेकास आणले पोलिस ठाण्यात 

मुलगा वडनेर (ता. कन्नड) येथील किसनराव थोरात विद्यालयात नववीत शिकत आहे. शनिवारी (ता.२९) किसन चव्हाण यांनी मायलेकास ग्रामीण पोलिस ठाण्यात आणून पोलिस निरीक्षक सुनील नेवसे यांच्या कानावर सर्व हकीकत घातली.

पोलिसांनी मुलासह ताब्यात घेऊन नायब तहसीलदार शेख हारुण यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी जामडी घाट येथे दाखल झाले. घरातून खड्डा खोदून मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया शनिवारी रात्री सुरू होती. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT