Crime esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग; धारदार शस्त्राने वार करून मेहुण्याचा खून

सकाळ डिजिटल टीम

पिशोर : तपोवन (ता.कन्नड) येथे साल्या-मेव्हण्यात दारूवरून झालेल्या वादात मेव्हण्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून झाल्याची घटना गुरुवारी (ता.१३) घडली. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंजीत अंकुश माळी (वय ४५ रा.घुसर ता.कन्नड ह.मू. तपोवन शिवार) असे मृताचे नाव आहे. तर नंदू बाबू गायकवाड (रा.तपोवन शिवार ता.कन्नड) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मृत आरोपी हे नात्याने साले व मेव्हणे आहेत. हे दोघेही तपोवन शिवारात एकमेकांच्या शेजारी राहतात. मृत रंजीत माळी व आरोपी नंदू गायकवाड हे गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तपोवन गावात किराणा सामान खरेदी करण्यासाठी गेले होते.

साडेसात वाजेच्या सुमारास वस्तीवर परत येत असताना रंजीतला नंदूने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु त्याने नंदूला पैसे दिले नाही. यानंतर घरी आल्यानंतर रंजीतने पत्नी कल्पना हिला तिच्या भावाने दारूला पैसे मागितल्याचे व शिवीगाळ केल्याचे सांगितले. मृताची पत्नी भावाला जाब विचारण्यास गेली व भावाला समजावून सांगत असतानाच नंदूने मेव्हण्याच्या मानेवर व खांद्यावर दोन वार केले व तो घटनास्थळावरून शेजारील डोंगरात पळून गेला.

यात रंजीत जागेवर मृत झाला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे व पोलिस उपनिरीक्षक सतीश बडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. करंजखेड आरोग्य उपकेंद्रात डॉ. अस्मा खान यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. गुरुवारी मृताची पत्नी कल्पना माळी हिच्या फिर्यादीवरून पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT