bus accident bus accident
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद - जळगाव रोडवर दोन बसचा भीषण अपघात; चालक गंभीर

या अपघातात औरंगाबाद - रावेर बसचा चालक मोसीन शेख (वय ४०, रा.फैजपूर) यांच्या पायाला आणि डोक्याला मोठा मार लागल्याने त्यांना तात्काळ सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले

सुनिल बोराडे

औरंगाबाद: औरंगाबाद - जळगाव रोडवरील खेतेश्वर पेट्रोल पंपासमोर गुरुवारी सकाळी ८:35 वाजता महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसची समोरासमोर टक्कर होऊन भीषण अपघात झाला. त्यात एक चालक गंभीर जखमी झाला आहे. औरंगाबादहून रावेरकडे जाणाऱ्या बसचे (एम एच ४० वाय ५१८६) समोरील टायर फुटल्यामुळे बसवरील ताबा सुटल्याने समोरून येणारी जळगाव - पुणे बस (एम एच २० बी एल ४०९५) वर चालकाच्या बाजूने धडकल्याने हा अपघात घडला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या अपघातात औरंगाबाद - रावेर बसचा चालक मोसीन शेख (वय ४०, रा.फैजपूर) यांच्या पायाला आणि डोक्याला मोठा मार लागल्याने त्यांना तात्काळ सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात दोन्ही बसमधील अनेक प्रवाशीदेखील किरकोळ जखमी झालेत. मात्र ते स्वतःच उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्याने त्यांची नावे कळू शकली नाहीत.

यावेळी या अपघाताची माहिती मिळताच सिल्लोड आगार प्रमुख आनंद चव्हाण, लेखाकार कृष्णा कावले, वाहतूक नियंत्रक रंगराव भोटकर, सरफराज पठाण, लिपिक बाबूराव पंडित यांच्यासह महामंडळाच्या अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत करून कार्यालयीन पंचनामा केला. दोन्ही अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना इतर बसमध्ये बसविण्यात आले. तसेच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT