Aurangabad Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Crime| औरंगाबादेत बस व रिक्षा चालकाचा वाद विकोपाला, एकाचा मृत्यू

रिक्षाचालकांच्या जमावाने बसचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतल्याने वातावरण तणावग्रस्त झाले होते.

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : प्रवासी भरण्याच्या कारणावरून खासगी बसचालक आणि रिक्षा चालक यांच्यात रविवारी (ता.सहा) रात्री वाद झाल्यानंतर रिक्षाचालकाचा त्याच बसखाली येऊन मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या रिक्षाचालकांच्या जमावाने बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सोमवारी (ता.सात) सकाळी वाळूज (Waluj) एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतल्याने वातावरण तणावग्रस्त झाले होते. प्रवासी भरण्याच्या कारणावरून कसाबखेडा (हल्ली मुक्काम जोगेश्वरी) येथील अविनाश राजेंद्र मगरे (वय ३२) हा रिक्षा चालक व श्री गणेश ट्रान्सपोर्ट या खासगी बसचा (एमएच 20 ईजी- 3562) चालक अशोक बाबुराव राठोड ( वय ४० , रा. चिकलठाणा, औरंगाबाद) यांच्यात रविवारी (ता.सहा) रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास पंढरपूर येथील ओअॅसिस चौकात वाद झाला. या वादानंतर तक्रार देण्यासाठी बसचालक राठोड हा वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आला. (Bus And Auto rikshaw Driver Quarrel, One Died In Aurangabad)

त्यास मेडिकल नेमून देऊन घाटी दवाखान्यात पाठवले. त्यानंतर राठोड व मगरे यांच्यात पुन्हा बाबा पेट्रोल पंपाजवळ वाद झाला. यावेळी अविनाश मगरे बसच्या चाकाखाली येऊन ठार झाला. या घटनेनंतर मगरे यास बसचालकाने धडक देऊन ठार मारल्याचा आरोप करत संतप्त रिक्षाचालकांनी सोमवारी (ता.सात) सकाळी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गर्दी केली. यावेळी वातावरण तणावग्रस्त झाल्याने वाढीव पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त विवेक सराफ व पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी संतप्त जमावाची समजूत काढत प्रकरण क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तेथे गुन्हा दाखल होईल असे सांगितले. (Aurangabad Crime)

....तर रिक्षाचालक वाचला असता

बसचालक राठोड व रिक्षा चालक मगरे यांच्यात पंढरपूर येथील ओअॅसिस चौकात वाद झाल्यानंतर ते पोलीस ठाण्यात आले होते. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही. जर कारवाई केली असती, तर रिक्षाचालक मगरे हा वाचला असता. या प्रकरणास वाळूज एमआयडीसी पोलीसच जबाबदार आहे, असा आरोप रिक्षाचालकांनी केला.

रिक्षाचालक ठाण्यात आलाच नाही

रिक्षाचालकांनी केलेला आरोप चुकीचा आहे. बस व रिक्षा चालकात पंढरपूर येथे वाद झाला. हे खरे आहे. मात्र तक्रार देण्यासाठी अविनाश मगरे हा पोलिस ठाण्यात आलाच नाही. असे वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT