Aurangabad News
Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

रस्ता निकृष्ट झाल्याने मंत्री देसाई देणार दणका 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : शहरातील पर्यटनस्थळ असलेल्या बीबीका मकबरा ते औरंगाबाद लेणी परिसरातील रस्त्याच्या कामाचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी यांच्याकडून पालकमंत्री सुभाष देसाई यांना प्राप्त झाला आहे. संबधित दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी हा अहवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना सुपूर्द करण्यात आला आहे. 

शहरातील बीबीका मकबरा ते लेणीला जोडणारा मुख्य रस्ता नाबार्ड अंतर्गत निधीमधून मंजूर झाला. परंतु अधिकारी व कंत्राटदाराने काम पूर्ण केले नाही. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी याविषयी पालकमंत्र्याकडे प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पालकमंत्र्यांनी त्याच दिवशी या रस्त्याची जिल्हाधिकारी व संबधित अधिकाऱ्यासमवेत पाहणी केली.

यावेळी रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे आढळून आले. तेथे अस्तित्वात असलेल्या अरुंद रस्त्यावर पूल बांधण्याची गरज असताना ते काम संबंधित कंत्राटदाराने पूर्ण केले नाही. दरम्यान, या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन संबधित कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपला अहवाल सादर केला आहे. पुढील कार्यवाहीसाठी हा अहवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. 

इतर रस्त्यांचे काय? 

श्री. देसाई यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच भेटीनंतर अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. दरम्यान, या कारवाईचे कौतुक होत आहे. मात्र, शहरातील अन्य रस्त्याची झालेली चाळण पालकमंत्री श्री. देसाई पाहणार आहेत का, अनेक महत्वाच्या रस्त्यावर खड्डे आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडत असल्याने दुचाकीधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्यांमुळे वाहनेही खिळीखिळी होत असतानाच धुळीचा त्रास होत असल्याने दुहेरी संकट कधी दूर होणार, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT