accident accident
छत्रपती संभाजीनगर

ताबा सुटल्याने कार धडकली कमानीला; तरुणाचा जागीच मृत्यू

बन्सीलालनगरातील अथर्व मुंबईला शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमुळे महाविद्यालय बंद असल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी तो घरी परतला होता

सुषेन जाधव

औरंगाबाद: क्रांती चौकातून कोकणवाडी चौकाच्या दिशेने भरधाव जाणारी कार कमानीच्या कॉलमवर धडकली. हा अपघात इतका भयंकर होता की, एअर बॅग उघडूनदेखील स्टेअरींग पूर्णपणे कार बाहेर पडले होते. त्यात छातीला गंभीर दुखापत होऊन कार चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला. अथर्व आशुतोष नावंदर (२४, रा. बन्सीलालनगर) असे अपघातातील तरुणाचे नाव आहे.

बन्सीलालनगरातील अथर्व मुंबईला शिक्षण घेत होता. लॉकडाऊनमुळे महाविद्यालय बंद असल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी तो घरी परतला होता. अथर्व नेहमीप्रमाणे मंगळवारी क्रांती चौकातील जीममध्ये कारने गेला होता. मात्र, त्याने साडेपाचच्या सुमारास पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतला. मित्राला क्रांतीचौकात सोडून तो बन्सीलालनगरच्या दिशेने निघाला. गोपाल टी चौक ओलांडताच अचानक वळणावर त्याचा ताबा सुटला. त्यामुळे कार थेट रस्त्यावरील दिशादर्शक फलकाच्या डाव्या बाजूला असलेल्या खांबावर जाऊन आदळली.

यात कारच्या समोरील बाजूचा अक्षरक्ष: चुराडा झाला. अथर्वच्या बाजूनेच कार आदळल्याने एअर बॅग उघडूनही तो गंभीर जखमी झाला. नियंत्रण कक्षातून अपघाताची माहिती मिळताच गस्तीवरील पोलिसांनी धाव घेत त्याला कारमधून बाहेर काढले. त्यानंतर त्याला घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक कौतिक गोरे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT