Chandrakant Khaire  Sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमधील पाचही बंडखोरांना आमदारांना आडवं करू; खैरेंचा इशारा

दत्ता लवांडे

औरंगाबाद : शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या भेटीला गेले आहेत. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादमधील पाचही बंडखोर आमदारांना आडवं करू, त्यांना आडवं करण्यासाठी आम्ही दोघे काफी आहोत असंही खैरे म्हणाले आहेत.

(Chandrakant Khaire On Shinde Group MLA)

शिवसेना हा आमचा परिवार आहे. बाळासाहेब हे या कुटुंबाचे प्रमुख होते, आता उद्धव ठाकरे हे या कुटुंबाचे प्रमुख आहेत. माझे आणि अंबादास दानवे यांच्याशी चांगले संबंध आहेत. अंबादास दानवे हे अभ्यासू व्यक्तिमत्व असून ते विधानपरिषेदेत विरोधीपक्षनेते म्हणून चांगलं काम करतील, देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही जास्त चांगलं काम ते करतील असं खैरे म्हणाले आहेत.

कुटुंबात हे तात्विक मतभेद असतात आणि अंबादास आणि माझ्या तात्विक मतभेद आहेत असंही ते म्हणाले आहेत. मी कडवट शिवसैनिक असून मी पक्षाचा आदेश पाळतो. पण औरंगाबादमधील आता जे पाच आमदार फुटले आहेत त्यांना आम्ही आडवं करणार असून अंबादास आणि मी यासाठी खूप आहोत असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेनेने विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची निवड केली. त्यानंतर आम्हाला यावेळी विचारात घेतले नसून आम्हाला निवडीबद्दल विचारलं असतं तर बरं झालं असतं असं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी व्यक्त केलं आहे. त्यानंतर ही आघाडी पर्मनंट आघाडी नसून तात्पुरती आघाडी होती असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं होतं.

महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या या नाराजीमुळे महाविकास आघाडी फुटणार का अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटातील औरंगाबादमधील आमदारांना आम्ही आडवं करू असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT