khaire khaire
छत्रपती संभाजीनगर

पक्षादेश डावलणाऱ्यांवर कारवाई होणार, चंद्रकांत खैरेंचा इशारा

बीड जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: शिवेसना हा शिस्त आणि आदेशावर चालणारा पक्ष आहे. संघटनेत केले जाणारे बदल हे वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि सर्वांना विश्वासात घेऊनच केले जातात. त्यामुळे वरिष्ठांचे आदेश डावलणाऱ्या आणि पक्षशिस्त मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई पक्षाच्या वतीने लवकरच केली जाईल, असा इशारा बीड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.

बीड जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. त्यातच जाधव यांची जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल काढण्यात आलेल्या मिरवणुकीतच त्यांच्या निवडीला माजलगाव येथील शिवसेना शहरप्रमुखांनी विरोध केला. मिरवणुकीतच जाधव यांच्या अंगावर वंगण टाकण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे जाधव समर्थकांनी त्याला चोप दिला. झाल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली, या प्रकारावर बीडचे संपर्कप्रमुख शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

मराठवाड्यातील बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांची संघटनात्मक जबाबदारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर आहे. गेल्या काही दिवसांत नव्याने पक्षाची बांधणी आणि पदाधिकारी बदलण्याच्या दृष्टीने त्यांनी या तीनही जिल्ह्यांचा दौरा केला होता. त्यानंतर बीड आणि लातूर या जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. यात जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुखांची नव्याने नेमणूक करण्यात आली. लातूरमध्ये केलेले बदल स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारले असले तरी बीडमध्ये मात्र नव्या जिल्हाप्रमुखांच्या निवडीवरून वाद निर्माण झाला.

बेशिस्त खपवून घेणार नाही..
बीड जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख चंद्रकांत खैरे यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. खैरे म्हणाले, जाधव यांची जिल्हाप्रमुखपदी झालेली निवड ही सर्वानुमते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने झाली आहे. जिल्हाप्रमुखांच्या अंगावर काळे फेकण्याचा झालेला प्रकार आणि त्यानंतर झालेली मारहाण हे चुकीचे आहे. याची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. शिवसेनेत अशा प्रकारची बेशिस्त कधीच खपवून घेतली जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट, थंडीची लाट ओसरली; हवामान विभागाचा अंदाज

CJI BR Gavai यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयात १० दलित न्यायाधीशांची नियुक्ती, ओबीसी कीती?

Pune Municipal Corporation Election : नऊ प्रभागांमध्ये महिला राज; निवडणुकीत मते ठरणार निर्णायक, पुण्यात ८३ महिला नगरसेवक निवडले जाणार

Jalna News: जालना हादरलं! दुचाकी वादातून तरुणाची मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

Dharashiv Accident: धाराशिवमधील अपघातात तिघे ठार; मोटारीचा टायर फुटून अपघात, ११ जण जखमी

SCROLL FOR NEXT