sambhaji nagar  saakal
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar : टेंडर ५१ हजारांचे अन् कमविले दहा लाख!

कंत्राटदाराला जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे अभय

सुनील इंगळे

छत्रपती संभाजीनगर - जिल्हा परिषदेच्या मैदानावर गणेशमूर्ती विक्री करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात जागा भाडे तत्त्वावर देण्याकरिता जिल्हा परिषदेने ५१ हजार रुपयांचे टेंडर काढले होते. या टेंडरमधून एका कंत्राटदाराने जवळपास ९ ते १० लाख रुपये कमविले! मूर्ती विक्रेत्यांकडून नियमबाह्य भाडे आकारत पैसे उकळले आहेत. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांकडून या कंत्राटदाराला ‘अभय’ मिळाल्याचा आरोप येथील मूर्ती विक्रेत्यांनी केला आहे.

गेल्या अनेक वर्षांनंतर जिल्हा परिषदेच्यावतीने पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेवर गणेशमूर्ती विक्रीकरिता तात्पुरत्या स्वरूपात जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी टेंडर काढले होते. दरम्यान, हे टेंडर कुणालाच न कळता एका अधिकाऱ्याच्या मर्जीतल्या ‘राजेश्वर सहस्रार्जुन’ या स्वयंसेवी संस्थेला ५१ हजारांत देण्यात आले. या टेंडरमध्ये १४ दिवसांसाठी केवळ ‘एक रुपया’ प्रतिस्क्वेअर फूट प्रतिदिवसाप्रमाणे भाडे वसुली करण्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु, कंत्राटदाराने मोठ्या मूर्ती विक्रेत्यांकडून दोन रुपये स्क्वेअर फूट तर छोट्या मूर्ती विक्रेत्याकडून दीड रुपये स्क्वेअर फुटाने पैसे वसूल केले आहेत.

यात मोठ्या विक्रेत्यांकडून प्रत्येकी जवळपास ५० ते ६० हजार रुपये तर छोट्या विक्रेत्यांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये पैसे वसूल केले आहेत. जिल्हा परिषदेच्या मैदानावर ७० मूर्ती विक्रेत्यांनी स्टॉल लावले होते. यात ११ स्टॉल बचत गटांच्या महिलासाठी राखीव आहेत. यासंदर्भात मूर्ती विक्रेता संघटनेच्यावतीने केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना टेंडरसंदर्भात निवेदन देण्यात आले होते; परंतु यात जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी सहभागी असल्याकारणाने कोणतीच कारवाई झाली नाही, असा आरोप मूर्ती विक्रेत्यांनी केला आहे.

जिल्हा परिषदेच्या मैदानावर पहिल्यांदाच टेंडर काढण्यात आले. यात कंत्राटदाराने विक्रेत्यांची लूट केली. माझ्याकडून जवळपास ६० हजार रुपये घेण्यात आले. मात्र, मला त्याची पावती देण्यात आलेली नाही.

- बी. एस. जवळेकर,

मूर्ती विक्रेता.

कंत्राटदाराच्या संदर्भात मूर्ती विक्रेत्यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या, यावर त्याला नोटीस बजावून नियमानुसार वसुली करण्याच्या सूचना केल्या होत्या.

- डॉ. सुनील भोकरे,

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी 25,100च्या वर, कोणते शेअर्स वाढले?

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचा एक शिलेदार गेला, त्यांनी दोन गळाला लावले; गोकुळच्या माजी अध्यक्षांसह एका नगराध्यक्षाचाही प्रवेश निश्चीत

Latest Marathi News Live Update : आमदार बापू पठारे धक्काबुक्कीप्रकरणी बंडू खांदवेसह २० जणांवर गुन्हा दाखल

Marathwada Farmer : नऊ महिन्यांत ७८१ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; मराठवाडा पुन्हा अश्रूंमध्ये भिजला, सरकार वेळीच दखल घेणार का?

Viral News: साहेब मला वाचवा ! बायको रात्री नागिन बनते अन्... घाबरलेल्या नवऱ्याच्या विनंतीने अधिकाऱ्यासह सगळेच चक्रावले

SCROLL FOR NEXT