sambhaji nagar
sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : क्रांती चौकात महाविकास आघाडी व भाजप आमने-सामने

- प्रकाश बनकर

छत्रपती संभाजीनगर - कंत्राटी भरतीचा जीआर रद्द राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शनिवारी (ता.२१)क्रांती चौकात जल्लोष आंदोलन करण्यात आले तर दुसरीकडे महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला होता तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला महाविकास आघाडीचे हे पाप आमच्यावर झोपवण्यात आल्याचा आरोप करत भाजप तर्फे क्रांती चौकात महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले दरम्यान या आंदोलनादरम्यान महाविकास आघाडी व भाजप आमने-सामने आले यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

भाजप तर्फे क्रांती चौकात शहराध्यक्ष शिरीष बोराळकर प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाविकास आघाडीचा पुतळा जाळण्यात आला व शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली.

दुसरीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करावा या आंदोलन करण्यात आले होते दरम्यान त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले म्हणून जल्लोष करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी क्रांती चौकात दाखल झाले होते दरम्यान त्याचवेळी भाजपचे दुसरीकडे आंदोलन सुरू होते.

महाविकास आघाडीच्या आंदोलनकर्त्यांनी सोबत ढोल आणल्यामुळे भाजपचे भाजपचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे आंदोलनाकडे आले यामुळे तुलाही समोरासमोर आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाल्या.

दरम्यान दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली व पोलिसांना मध्यस्थी करून यांनी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व भाजपला बाजूला केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT