Teacher Molest School Girl chhatrapati sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : चक्क शिक्षकच करायचा मुलींशी अश्लील चाळे; वर्गातील सीसीटीव्हीत झाले कैद, आरोपीला बेड्या

वर्ग शिक्षकानेच पाचवीच्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस

सकाळ वृत्तसेवा

Teacher Molest School Girl : चक्क वर्ग शिक्षकानेच पाचवीच्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना जून ते आठ जुलै दरम्यान मुकूंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत घडली. विशेष म्हणजे हा प्रकार वर्गात लावलेल्‍या सीसीटीव्हीद्वारे समोर आला.

या प्रकरणी मुख्याध्यापकांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर विद्यार्थिनीशी चाळे करणाऱ्या शिक्षकाविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित आरोपी शिक्षकाला अटक केल्याची माहिती मुकूंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

विजय सीताराम हिवाळे (रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी) असे त्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी मुकूंदवाडीतील एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापकाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी शिक्षक विजय हा मुलींशी अश्लील हावभाव करत बोलतो, अश्लील नजरेने बघतो, तसेच मुलांनाही गरजेपेक्षा जास्त मारहाण करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

त्यानुसार शाळा प्रशासनाने आरोपी शिकवत असलेल्या वर्गात लावलेल्या सीसीटीव्हीची तपासणी केली असता, आरोपी विजय हा पाचवीच्या वर्गातील मुलींशी आठ मार्च रोजी अश्लील चाळे करताना सीसीटीव्हीत कैद झालेला दिसला. इतकेच नव्हे तर आरोपी विजय याने २३ जून रोजी वर्गातील एका मुलाला आवश्यकतेपेक्षा जास्त मारहाण केल्याचेही सीसीटीव्हीत समोर आले.

विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या वर्गशिक्षकाला अटक केली आहे. पीडित विद्यार्थिनींचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. विद्यार्थिनींनेही आपल्यासोबत घाणेरडा प्रकार घडल्याचे जबाब दिले आहेत. योग्य ती कारवाई करत आहोत.

- विठ्ठल ससे, पोलिस निरीक्षक, मुकूंदवाडी, पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT