chhatrapati sambhaji nagar drug case waluj company make drugs crime marathi news esakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar Drug Case : वाळूजमधील कंपनीत व्हायची ड्रग्ज निर्मिती

संभाजीनगरातील प्रकरणाची वाढतेय व्याप्ती

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरासह पैठण औद्योगिक वसाहतीतील ड्रग्ज रॅकेटची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये गुजरात पोलिस, महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जिल्हाभरात ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करीत तब्बल २५० कोटींचे ड्रग्ज पकडले होते.

विशेष म्हणजे वाळूज एमआयडीसीतील एका केमिकल्स कंपनीत जितेश हिन्होरिया हा एमडी ड्रग्जची निर्मिती करायचा, अशी पक्की माहिती ‘डीआरआय’च्या पथकाला मिळाली होती. त्यावरून शुक्रवारी (ता. २०) ‘डीआरआय’ ‘त्या’ कंपनीत छापा मारून मोठ्या प्रमाणात रसायन सील केले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी गुजरात पोलिसांच्या एका पथकाने एका ड्रग्ज वितरित करणाऱ्या (पेडलरला) बेड्या ठोकल्या होत्या. त्याच्या तपासात जितेश हिन्होरियाचे ‘कनेक्शन’ उघड झाल्यावर त्यांनी तब्बल २० दिवस पाळत ठेवून २२ ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरात दोन कंपन्या सील करीत २३ किलो कोकेन,

७.४ किलो मेफेड्रोन, ४.३ किलो केटामाइन, ९.३ किलो वजनाचे मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण आणि सुमारे ३० लाख रुपये रोकड, असा २५० कोटींचा मुद्देमाल जप्त केला; तसेच जितेश हिन्होरिया आणि संदीप कुमावत या दोघांना अटक केली.

जितेशसाठी तगडा पोलिस बंदोबस्त

ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी जितेश याला अटक केल्यानंतर त्याने बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने आतमध्ये जात खिडकीची काच फोडली आणि काचेने गळा, मनगट कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात त्याच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर मात्र जितेश याला जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्या ठिकाणी जितेश याच्यावर उपचार सुरू आहेत, तेथे त्याच्याशी संबंधित असलेल्या डॉक्टर, अधिकाऱ्यांशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. उपचार घेत असलेल्या ठिकाणी एक अधिकारी आणि पाच पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT