Accident News Esakal
छत्रपती संभाजीनगर

Accident News: ढाब्यावरील जेवणाची ती भेट ठरली शेवटची, घरी जाताना दोन जिवलग मित्रांचा अपघातात जागीच मृत्यू, तर १ गंभीर जखमी

भरधाव दुचाकीवरून विरुद्ध दिशेने ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघा मित्रांच्या अज्ञात बोलेरो गाडीने जोरदार धडक

अंकिता खाणे (Ankita Khane)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीवरून विरुद्ध दिशेने ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघा मित्रांना अज्ञात बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. हा भीषण अपघात जालना रोडवरील सुंदरवाडी परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला आहे.

अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. विजय जगन्नाथ काकडे, अभिषेक राजू लोकल असे मृत झालेल्या दोन मित्रांची नावे आहे. तर उमेश उर्फ गुड्डू उमानंद कत्तिकर यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक कंपनीतुन आल्यानंतर विजय, अभिषेक, उमेश हे तिघे दुचाकीवरुन जालना रोडवर सुंदरवाडी येथील ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले. दरम्यान, जेवणानंतर तिघेही घराकडे निघाले. दुचाकीवरून विरुद्ध दिशेने जात असताना झाल्टा फाट्यावर अज्ञात बोलेरोने त्यांना जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बोलेरो चालक घटनास्थळावरून पसार झाला. जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असतात दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर एकावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं विसर्जन मिरवणुकीत ढोलवादन

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात 'चिकमोत्याची माळ' गाण्यावर थिरकली तरुणाई; सोशल मीडियावर रील्सना प्रचंड प्रतिसाद

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मराठी कलाकारांनी घेतले शामनगरच्या राजाचे दर्शन

Ganesh Visarjan 2025 : श्री विसर्जनादरम्यान लेंडी नदीत देगावचा तरुण बुडाला; देगाव येथे शोकाकुल वातावरणात शनिवारी अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT